India vs Australia 4th Test: सिडनी टेस्टसाठी भारतीय स्पिनर आर. अश्विन अनफीट!
अश्विन दुखापतग्रस्त आहे. फीटनेस टेस्ट देऊ न शकल्याने त्याला संघात स्थान मिळवता आले नाही.
India vs Australia 4th Test : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया हा चौथा कसोटी सामना 3 जानेवारीपासून ऑस्ट्रेलियातील सिडनी (Sydney) शहरात रंगणार आहे. आज 13 भारतीय खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. भारताचा अव्वल स्पिनर आर. अश्विनला (Ravichandran Ashwin) मात्र संघात स्थान मिळवता आले नाही. अॅडलेड कसोटीपासून दुखापतग्रस्त असलेला आर. अश्विन चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.
कसा असेल भारतीय संघ ?
सिडनीतील चौथ्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, उमेश यादव, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
भारताने चार सामन्यांच्या कसोटीमध्ये 2-1 अशी आघाडी मिळवली आहे. आता सिडनीमध्ये 3-7 जानेवारीदरम्यान कसोटी सामना रंगणार आहे. यापूर्वी दुखापतीमुळे पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया दौर्यातून बाहेर पडला आहे. तर रोहित शर्माला काही दिवसांपूर्वी मुलगी झाल्याने तिला पाहण्यासाठी रोहित भारतामध्ये परतला आहे.