Fastest Test Century against India: भारताला गवसणी घालणारे! 'हे' आहेत भारताविरुद्ध सर्वात जलद टेस्ट शतक झळकावणारे टॉप 5 फलंदाज

पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने (Team India) बॅट आणि बॉल दोन्हीने आपले वर्चस्व दाखवले. तिसऱ्या दिवशी सुरुवात होताच भारताने लागोपाठ 2 विकेट्स घेतले. एक वेळ अशी होती की इंग्लंडने 84 धावांवर आपले टॉप 5 फलंदाज गमावले होते. येथून इंग्लंडचा संघ डगमगेल असे वाटले होते, परंतु युवा फलंदाज जैमी स्मिथ (Jamie Smith) वेगळ्याच मूडमध्ये क्रीजवर उतरला.

Jamie Smith (Photo Credit- X)

India vs England 2nd Test 2025: सध्या टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर असून, 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना एजबेस्टनमध्ये (Edgbaston) सुरू आहे. पहिल्या दोन दिवसांत भारतीय संघाने (Team India) बॅट आणि बॉल दोन्हीने आपले वर्चस्व दाखवले. तिसऱ्या दिवशी सुरुवात होताच भारताने लागोपाठ 2 विकेट्स घेतले. एक वेळ अशी होती की इंग्लंडने 84 धावांवर आपले टॉप 5 फलंदाज गमावले होते. येथून इंग्लंडचा संघ डगमगेल असे वाटले होते, परंतु युवा फलंदाज जैमी स्मिथ (Jamie Smith) वेगळ्याच मूडमध्ये क्रीजवर उतरला. त्यांनी येताच एकदिवसीय शैलीत फलंदाजी करत तूफानी शतक झळकावले.

जैमी स्मिथने 80 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले

जैमी स्मिथने 80 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि हॅरी ब्रूकसोबत (Harry Brook) 170 धावांची अभेद्य भागीदारी रचली. जैमी स्मिथच्या या 80 चेंडूंतील शतकाने रेकॉर्ड बुक हादरवून टाकले आहे. तो भारताविरुद्ध सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारा जगातील चौथा फलंदाज बनला आहे. सध्या एजबेस्टनमध्ये सामन्याचा तिसरा दिवस आणि दुसरा सेशन सुरू आहे. टीम इंडियाच्या 587 धावांना प्रत्युत्तर देताना 5 गडी गमावून 300 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

भारताविरुद्ध सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारे टॉप 5 फलंदाज

जैमी स्मिथ हा कसोटीत भारताविरुद्ध सर्वात जलद शतक करणारा जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. त्याने 2006 मध्ये लाहोरमध्ये 81 चेंडूंवर शतक झळकावणाऱ्या कामरान अकमलचा (Kamran Akmal) विक्रम मोडला. या यादीत डेव्हिड वॉर्नर (David Warner) पहिल्या स्थानावर आहे, ज्याने 2012 मध्ये पर्थमध्ये केवळ 69 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. हा विक्रम आजही अबाधित आहे.

69 चेंडू – डेव्हिड वॉर्नर, पर्थ, 2012

75 चेंडू – एबी डिव्हिलियर्स, सेंच्युरियन, 2011

78 चेंडू – शाहिद आफ्रिदी, लाहोर, 2006

80 चेंडू – जैमी स्मिथ, बर्मिंगहॅम, 2025*

81 चेंडू – कामरान अकमल, लाहोर, 2006

इंग्लंडसाठी संयुक्तपणे तिसरे सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारे फलंदाज

जैमी स्मिथ इंग्लंडसाठी संयुक्तपणे सर्वात जलद कसोटी शतक झळकावणारा तिसरा खेळाडू बनला आहे. त्याने एजबेस्टनमध्ये 80 चेंडूंमध्ये शतक केले. हॅरी ब्रूकनेही 2022 मध्ये रावळपिंडी येथे पाकिस्तानविरुद्ध 80 चेंडूंमध्ये शतक ठोकले होते. इंग्लंडसाठी कसोटीत सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम गिल्बर्ट जेसप (Gilbert Jessop) यांच्या नावावर आहे, ज्यांनी 1902 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता. हा विक्रम आजही कायम आहे.

76 चेंडू – गिल्बर्ट जेसप वि. ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, 1902

77 चेंडू – जॉनी बेअरस्टो वि. न्यूझीलंड, ट्रेंट ब्रिज, 2022

80 चेंडू – हॅरी ब्रूक वि. पाकिस्तान, रावळपिंडी, 2022

80 चेंडू – जैमी स्मिथ वि. भारत, एजबेस्टन, 2025*

85 चेंडू – बेन स्टोक्स वि. न्यूझीलंड, लॉर्ड्स, 2015

कोण आहे जैमी स्मिथ?

जैमी स्मिथ इंग्लंडचा 24 वर्षीय युवा यष्टीरक्षक-फलंदाज आहेत. स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर त्याला कसोटीत संधी मिळाली आहे. त्यांनी 2024 मध्ये कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 12 कसोटी सामन्यांतील 19 डावांमध्ये 51.69 च्या सरासरीने 827 धावा केल्या आहेत. त्यांच्या कारकिर्दीतील हे दुसरे कसोटी शतक आहे. आतापर्यंत त्यांनी 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13 सामन्यांत त्याने एका अर्धशतकासह 258 धावा केल्या आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

Jamie Smith India England Test Edgbaston Test Fastest Test Century Cricket Records England Cricket Team India BCCI Cricket News Cricket Practice Video Cricket Training Session England england national cricket team England National Cricket Team vs India National Cricket Team England Tour 2025 England vs India England vs India Test England vs Team India INDIA NATIONAL CRICKET TEAM India vs England Indian Cricket Team Indian Cricket Updates Lord's Cricket Ground Shubman Gill Shubman Gill Captain Test Series 2025 इंग्लंड इंग्लंड दौरा 2025 इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ भारतीय क्रिकेट अपडेट भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट बातम्या टीम इंडिया कसोटी मालिका 2025 भारतीय क्रिकेट संघ भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ लॉर्ड्स क्रिकेट मैदान शुभमन गिल कर्णधार शुभमन गिल India National Cricket Team vs England National Cricket Team Jasprit Bumrah Yashasvi Jaiswal Harry Brook Ollie Pope KL Rahul भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ जसप्रीत बुमराह यशस्वी जयस्वाल हॅरी ब्रुक ऑली पोप केएल राहुल ऋषभ पंत Rushabh Pant Birmingham Edgbaston बर्मिंगहॅमम एजबॅस्टन जैमी स्मिथ भारत इंग्लंड कसोटी एजबेस्टन कसोटी जलद कसोटी शतक क्रिकेट रेकॉर्ड इंग्लंड क्रिकेट
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement