IND vs PAK T20 WC Playing 11: मेलबर्नमध्ये आज भारत-पाकिस्तान युद्ध, दोन्ही संघांची अशी असु शकते ही प्लेइंग-11

या सामन्यासह दोन्ही संघ या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करत आहेत.

IND vs PAK (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) सुपर 12 सामने सुरू झाले असून रविवारी भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. या सामन्यासह दोन्ही संघ या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करत आहेत. गेल्या टी-20 विश्वचषकातही भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता आणि टीम इंडियाने हा सामना 10 विकेटने गमावला होता. मात्र, त्यानंतर भारताच्या संघात बरेच बदल झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावर संशय आहे. त्याचवेळी फखर जमान पाकिस्तानसाठी या सामन्यातून बाहेर पडला आहे. तेसच या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग-11 काय असु शकते तर यावर नजर टाकुन घ्या...

भारताचा फलंदाजीचा क्रम निश्चित

भारताचा फलंदाजीचा क्रम आधीच ठरलेला आहे. यामध्ये बदलाव होणे शक्य नाही. रोहित-राहुल जोडी डावाची सुरुवात करेल. हार्दिक पांड्या विराटसोबत तिसऱ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव मधल्या फळीत फलंदाजी करेल. सामना संपवण्याची जबाबदारी दिनेश कार्तिकवर असेल. कार्तिकच्या जागी पंतला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. भारताच्या फलंदाजीत डावखुरा फलंदाज नसला तरी तो बदल होण्याची शक्यता कमी आहे. (हे देखील वाचा: How to Watch IND vs PAK Live Streaming Online, ICC T20 World Cup 2022? भारतीय वेळेनुसार आणि विनामूल्य कसा पाहणार सामना घ्या जाणून)

अश्विन-हर्षल खेळण्याची शक्यता कमी

भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपली गोलंदाजी ठरवण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह खेळणे जवळपास निश्चित आहे, मात्र अश्विनच्या जागी युझवेंद्र चहलला संधी दिली जाऊ शकते. चहल हा एक लेग स्पिनर आणि मनगटाचा फिरकी गोलंदाज आहे ज्याच्याकडे टी-20 मध्ये सामने फिरवण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर हर्षल पटेलच्या जागी मोहम्मद शमीला संधी दिली जाऊ शकते. शमीने तंदुरुस्त झाल्यानंतर सराव सामन्यात फक्त एक षटक टाकले आहे. यामध्ये त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तसेच या सामन्यातुन हर्षल पटेलला सामन्यातुन वगळले जावू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग-11

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif