IND vs PAK T20 WC 2022 Live Streaming Online: टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना, जाणून घ्या कधी-कुठं पाहणार सामना

हे दोन्ही संघ वर्षभरानंतर टी-20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत.

IND vs PAK (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2022) रविवारी (23 ऑक्टोबर) शानदार सामना रंगणार आहे. भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (IND vs PAK) संघ असेल. या दोघांमधील हा सामना मेलबर्नमध्ये होणार आहे. दोन्ही संघांना विजयाने मोहिमेची सुरुवात करायची आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ चाहत्यांना दिवाळीची भेट देण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हे दोन्ही संघ वर्षभरानंतर टी-20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. दुबईत गेल्या वेळी शाहीन आफ्रिदीची धोकादायक गोलंदाजी आणि बाबर आझम-मोहम्मद रिझवान यांच्या स्फोटक खेळीमुळे पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला होता. विश्वचषकात भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. तसेच या सामन्याचे तुम्ही लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) कुठे पाहू शकतात त्याबद्दल जाणून घ्या...

भारत-पाकिस्तान यांच्यातील T20 सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी आहे. तसेच हा सामना  मेलबर्नमध्ये होणार आहे

सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता आहे. नाणेफेक दुपारी 1.00 वाजता होईल. (हे देखील वाचा: IND vs PAK: सचिन तेंडुलकरचा भारतीय फलंदाजांना सल्ला - शाहीन आफ्रिदीविरुद्ध 'सरळ' खेळण्याचा प्रयत्न करा)

सामना कोणत्या चॅनलवर पाहता येईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे T20 विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार आहेत. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह भारत आणि पाकिस्तान सामना पाहू शकता.

फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह-स्ट्रीमिंग कशी बघायची?

भारतातील डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

विनामूल्य सामना कसा पाहणार?

हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर डीडी फ्री डिशवर प्रसारित केला जात आहे. डीडी स्पोर्ट्स चॅनलसाठी कोणतेही शुल्क नाही. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही पैसे न भरता हा सामना पाहू शकता.