2024 ICC Women’s T20 World Cup Points Table Update: विश्वचषकात भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव, तर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेची विजयाने सुरुवात; येथे पाहा पॉइंट टेबलची स्थिती
महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 18 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जातील. या स्पर्धेची ही 9वी आवृत्ती आहे.
2024 ICC Women’s T20 World Cup Points Table: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया, टीम इंडिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. तर बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. प्रत्येक संघाचा एकाच गटातील इतर चार संघांशी एकदा सामना होईल आणि त्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 18 दिवसांत एकूण 23 सामने खेळवले जातील. या स्पर्धेची ही 9वी आवृत्ती आहे.
भारताची पराभवाने सुरुवात
स्पर्धेतील चौथ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 160 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर शेफाली वर्मा अवघ्या 11 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली. संपूर्ण भारतीय संघ 19 षटकांत 102 धावा करून ऑलआऊट झाला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने भारताचा 58 धावांनी पराभव केला.
GROUP B | |||||||||
No |
Team |
M |
W |
L |
T |
N/R |
PTS |
Net RR |
Form |
1 |
Bangladesh Women |
1 | 1 |
0 |
0 |
0 |
2 | +0.800 |
----- |
2 |
England Women |
0 |
0 |
0 |
0 |
0 |
0 |
0 |
----- |
3 |
West Indies Women |
1 |
0 |
1 |
0 |
0 |
0 |
-0.773 |
----- |
4 |
South Africa Women |
1 | 1 |
0 |
0 |
0 |
2 | +0.773 |
----- |
5 |
Scotland Women |
1 |
0 |
1 |
0 |
0 |
0 |
-0.800 |
----- |
GROUP A | |||||||||
No |
Team |
M |
W |
L |
T |
N/R |
PTS |
Net RR |
Form |
1 |
India Women |
1 |
0 |
1 |
0 |
0 |
0 |
-2.900 |
----- |
2 |
Australia Women |
0 |
0 |
0 |
0 |
0 |
0 |
0 |
----- |
3 |
Pakistan Women |
1 | 1 |
0 |
0 |
0 |
0 |
+1.550 |
----- |
4 |
Sri Lanka Women |
1 |
0 |
1 |
0 |
0 |
0 |
-1.550 |
----- |
5 |
New Zealand Women |
1 | 1 |
0 |
0 |
0 |
2 | +2.900 |
----- |
हे देखील वाचा: IND vs NZ Amelia Kerr Run Out Controversy: टीम इंडियासोबत झाली चीटिंग? फलंदाज बाद होऊनही पॅव्हेलियनमध्ये गेला नाही; वाचा नेमक काय घडल
सर्व संघ आपापल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. दोन्ही गटातील टॉप-2 संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे.