IND W Beat WI W 3rd ODI 2024 Match Scorecard: भारताने एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा केला क्लीन स्वीप, दीप्ती शर्माने केला मोठा पराक्रम

हा सामना जिंकून टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश केला आहे. टीम इंडियाने तिसरा सामना 5 विकेटने जिंकला. दीप्ती शर्माने हा सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतीय महिला क्रिकेट टीम( Photo Credit: X/@BCCIWomen)

India Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team, 3rd ODI ICC Championship Match Scorecard: भारतीय महिला क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना वडोदरा येथे खेळला गेला. हा सामना जिंकून टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश केला आहे. टीम इंडियाने तिसरा सामना 5 विकेटने जिंकला. दीप्ती शर्माने हा सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तिसऱ्या सामन्यात दीप्तीने अप्रतिम गोलंदाजी करत एक खास विक्रम आपल्या नावावर केला. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत; भारताने 5 विकेट गमावून केल्या 164 धावा)

भारताने  5 विकेटने जिंकला हा सामना

या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 38.5 षटकात केवळ 162 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून फलंदाजी करताना चिनेल हेन्रीने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. याशिवाय रेणुका सिंगने 4 विकेट घेतल्या होत्या.

163 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवातही विशेष झाली नाही. टीम इंडियाने 55 धावांतच 3 विकेट गमावल्या होत्या. भारतीय संघाने हे लक्ष्य 28.2 षटकात 5 गडी गमावून पूर्ण केले. भारताकडून फलंदाजी करताना दीप्ती शर्माने सर्वाधिक 39 धावांची नाबाद खेळी खेळली. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने 32 धावा केल्या. तर जेमिमाने २९ धावांची इनिंग खेळली होती. तर रिचा घोष 29 धावा करून नाबाद राहिली.

दीप्ती शर्माने इतिहास रचला

या सामन्यात दीप्ती शर्माने 6 विकेट घेत इतिहास रचला. आता दीप्ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 5 बळी घेणारी पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर तीन पाच विकेट्स हाॅल आहेत.

Tags

cricket women DY Patil Stadium Hayley Matthews in w vs wi w in w vs wi w ODI IND vs WI ind vs wi odi ind vs wi w ind vs wi women ind vs wi women’s ODI IND W vs WI W IND W vs WI W 3rd ODI 2024 IND W vs WI W 3rd ODI 2024 Scorecard ind w vs wi w ODI scorecard IND-W vs WI-W 2024 IND-W vs WI-W 3rd ODI 2024 Preview ind-w vs wi-w today match Ind(W) IND(W) vs WI(W) India India vs West Indies India vs West Indies Women india w vs wi w India Women vs West Indies Women India Women vs West Indies Women Live Streaming India women's national cricket team india women's national cricket team vs west indies women match scorecard India Women’s Cricket Team India Women’s National Cricket Team vs West Indies Women’s Cricket Team Indian Women National Cricket Team Indian women's national cricket team indw vs wi-w indw vs wiw ODI Jemimah Rodrigues Kotambi Stadium Kotambi Stadium Pitch Report Shafali Verma Smriti Mandhana Titas Sadhu Vadodara Vadodara Pitch Report Vadodara Weather Vadodara Weather Report Vadodara Weather Update West Indies West Indies vs India West Indies Women National Cricket Team West Indies Women vs India Women West Indies women's cricket team West Indies women's cricket team vs India women's national cricket team where to watch india women's national cricket team vs west indies women wi w vs ind w भारत भारत डब्ल्यू वि वेस्ट इंडीज प भारत विरुद्ध वेस्ट इंडिज भारत महिला क्रिकेट संघ भारत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ भारतीय महिला वि वेस्ट इंडीज महिला भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ वडोदरा वडोदरा हवामान वेस्ट इंडीज वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ वेस्ट इंडिज महिला विरुद्ध भारतीय महिला वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ