IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत; भारताने 5 विकेट गमावून केल्या 164 धावा

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात भारताने 5 विकेट गमावून 164 धावा केल्या आहे. भारताकडून ऋषभ पंच 6 आणि रवींद्र जडेजा 4 धावांवर खेळत आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कॅमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

IND vs AUS 4th Test 2024 Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत; भारताने 5 विकेट गमावून केल्या 164 धावा
Virat Sharma (Photo Credit - X)

Australian Men's National Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात भारताने 5 विकेट गमावून 164 धावा केल्या आहे. भारताकडून ऋषभ पंच 6 आणि रवींद्र जडेजा 4 धावांवर खेळत आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कॅमिन्स आणि स्कॉट बोलँडने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

हे देखील वाचा: IND vs AUS 4th Test 2024: रोहित शर्माचा बॅटसह फ्लॉप शो सुरूच, गेल्या 14 डावांमध्ये आश्चर्यकारक सरासरी

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 474 आटोपला

पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 4 फलंदाजांच्या अर्धशतक आणि स्टीवन स्मिथच्या 140 धावांच्या जोरावर दुसऱ्या दिवशी 474 धावांवर केल्या. सॅम कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर कॉन्स्टास 60 आणि उस्मान ख्वाजा 57 धावा करून बाद झाला. मार्नस लॅबुशेन 72 धावा करून बाद झाला. त्यानंतर आज म्हणजे दुसऱ्या दिवशी स्टीव्हन स्मिथ पॅट कॅमिन्स यांनी 112 धावांची भागीदारी रचली. पॅट कॅमिन्स 40 आणि स्मिथ 140 धावा करुन बाद झाला. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले. याशिवाय आकाश दीप 2 आणि वॉशिंग्टन सुंदरनेही एक विकेट घेण्यात यश मिळवले.

यशस्वी जैस्वालच्या बॅटमधून 82 धावा

यानंतर भारतीय डावाला सुरुवात झाली. सुरुवात चांगली झाली नाही, यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण यशस्वी धावबाद होताच विराट कोहलीही चालायला लागला. रोहित शर्माची बॅट पुन्हा फ्लॉप झाली. केएल राहुल उत्कृष्ट चेंडूवर बाद झाला. यशस्वी जैस्वालच्या बॅटमधून 82 धावा निघाल्या. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा 310 धावांनी मागे आहे, ज्यामध्ये फॉलोऑन टाळण्यासाठी त्याला आणखी 110 धावा कराव्या लागतील.

(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2024 12:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).