ICC World Cup 2019 मध्ये Ind Vs Pak दरम्यान सचिन तेंडुलकर सोबत तुलना झालेल्या रोहित शर्माच्या Upper Cut वर सचिनचा खास रिप्लाय
डकवर्थ लुईस नियमानुसार वर्ल्डकपच्या भारत पाक सामन्यांत भारताने पाकिस्तान संघावर 89 धावांनी विजय मिळवला.
क्रिकेटच्या मैदानावरील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) खेळी पाहणं ही आजची अनेकांसाठी ट्रिट आहे. त्याचा खेळ केवळ त्याच्या चाहत्यांना नव्हे तर अनेक दिग्गजांनाही खिळवून ठेवत असे. रविवारी (16 जून) मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या यंदाच्या भारत पाक सामन्यात रोहित शर्माच्या अप्पर कटने अनेकांना सचिनची आठवण झाली. आयसीसीनेदेखील सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अप्पर कटचा व्हिडिओ शेअर केला. यावर सचिनने त्याच्या खास अंदाजात ट्विटरच्या माध्यमातून रिप्लाय दिला आहे. IND vs PAK, CWC 2019 : रोहित शर्माने मारलेल्या Six ने प्रेक्षकांना झाली सचिनची आठवण (Video)
सचिन तेंडुलकरचा रिप्लाय
सचिन तेंडुलकरने आयसीसीच्या ट्विटवर रिप्लाय देताना आम्ही टीम इंडियाचे प्रतिनिधित्त्व करतो,आमच्यामध्ये मुंबईकर हा समान दुवा आहे. असे म्हणत रोहितचंही कौतुक केलं आहे. 2003च्या वर्ल्डकप सामन्यात सचिनने शोएब अख्तरच्या बॉलवर अशाच प्रकारे अप्पर कट मारला होता. रोहितच्या धडाकेबाज खेळीदरम्यान क्रिकेट चाहत्यांनी पुन्हा जुन्या आठवणी जागवल्या. टीम इंडिया मधील 'हा' सलामीवीर बनू शकतो 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'
सध्या इंग्लंडमध्ये भारतीय संघ वर्ल्डकपच्या साखळीसामन्यामध्ये विजयाची हॅट्रिक मारली आहे. मागील भारत - पाक सामन्यात रोहितने दणदणीत शतक ठोकलं. पावसाचा व्यत्यय येत असल्याने अखेर सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार लावण्यात आला. त्यामध्ये भारताने पाकिस्तान संघावर 89 धावांनी विजय मिळवला.