IND vs WI 2nd T20I: शिवम दुबे याची अर्धशतकी खेळी, भारताचे वेस्ट इंडिजसमोर 171 धावांचे लक्ष्य
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 7 बाद 170 धावा केल्या. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतासाठी शिवम दुबे याने सर्वाधिक 54 धावा केल्या.
भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील दुसरा टी-20 सामना तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. टॉस गमावून पहिले फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने (Indian Team) 7 बाद 170 धावा केल्या. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. एकीकडे टीम इंडिया सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, तर विंडीज संघ 3 सामन्यांच्या मालिकेत कायम राहण्याच्या निर्धारित आहे. पहिले फलंदाजी करणाऱ्या भारतासाठी शिवम दुबे (Shivam Dube) याने सर्वाधिक 54 धावा केल्या. दुसरीकडे, विंडीजकडून खारी पियरे, जेसन होल्डर आणि शेल्डन कोटरेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली, तर हेडन वॉल्श जूनियर (Hayden Walsh Jr) आणि केसरीक विल्यम्स (Kesrick Williams) यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. होल्डरने पहिल्या सामन्याप्रमाणेच यंदाही 4 ओव्हरमध्ये सर्वाधिक 42 धावा लुटवल्या. (IND vs WI 2nd T20I: रोहित शर्मा ला पछाडत विराट कोहली बनला टी-20 चा बॉस, मोडला हिटमॅनचा विश्वरेकॉर्ड)
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला 24 धावांच्या स्कोरवर पहिला धक्का केएल राहुल (KL Rahul) याच्या रूपात बसला. राहुल 11 धावांवर असताना पियरेच्या चेंडूवर हेटमेयरकडे झेलबाद झाला. भारताला दुसरा धक्का उपकर्णधार रोहित शर्मा याच्या रूपात लागला. जेसन होल्डर याने रोहितला 18 चेंडूत 15 धावांवर बोल्ड करत पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला. दुसर्या सामन्यात विराट कोहली याने स्वत: तिसर्या क्रमांकावर फलंदाजीसाठी न येत शिवम दुबे याला बढती दिली. शिवमने मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा करून घेतला आणि प्रभावी फलंदाजी करत पाहिले टी-२० अर्धशतक केले. दुबे आणि रोहितने मिळून पॉवर प्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. पण शिवमची खेळी जास्त काळ टिकू शकली नाही आणि तो 54 धावांवर वॉल्शच्या चेंडूवर हेलमेयरकडे झेल बाद झाला. त्यानंतर, विराटही प्रभाव पाडण्यात अपयशी राहिला. विराटला 19 धावांवर विल्यम्सने झेलबाद केले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या रिषभ पंत याने शेवटपर्यंत सावध फलंदाजी केली आणि धावांवर नाबाद राहिला. यानंतर श्रेयस अय्यर सुद्धा 10 धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजा याच्या रूपात भारताला सहावा धक्का बसला. त्याया 9 धावांवर विल्यम्सने बोल्ड केले.
वेस्ट इंडिजचा कर्णधार पोलार्डने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने संघात बदल केला आहे. दिनेश रामदिन याच्या जागी निकोलस पूरन याला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, टीम इंडियाने प्लेयिंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही केला. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास मालिकाही त्यांच्या नावावर होईल. यापूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात भारताने 6 विकेटने विजय मिळवला होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)