IND vs SA Test 2019: 'या' 5 खेळाडूंमधील लढत बनवणार भारत-दक्षिण आफ्रिका मालिका रंगतदार
टी-20 च्या रोमांचक मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेसाठी आमने-सामने येणार आहे. दोन्ही संघांकडे जागतिक स्तरावरील खेळाडू आहेत आणि पुढील तीन आठवड्यांमध्ये कोण कोणावर वरचढ होईल यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. 'या' 5 खेळाडूंमधील काही रोमांचक लढत
टी-20 च्या रोमांचक मालिकेनंतर भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघ 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेसाठी आमने-सामने येणार आहे. दोन्ही संघातील पहिली टेस्ट विशाखापट्टणम खेळवण्यात येईल. टी-20 मालिका 1-1 ने ड्रॉ झाली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यावर दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाने 7 विकेट्सने आफ्रिकेवर वर्चस्व राखत विजय मिळवला, तर तिसऱ्या आणि अंतिम मॅचमध्ये आफ्रिका संघाने जोरदार पुनरागमन केले आणि 9 विकेट्सने विजय मिळवत मालिका 1-1 ने ड्रॉ केली. दुसऱ्या मॅचमध्ये भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीने प्रभावित केले तर निर्णायक सामन्यात त्यांची फलंदाजी गडगडली. त्यानंतर गोलंदाजीने देखील भारत काही प्रभाव पडू शकला नाही. (IND vs SA Test 2019: विराट कोहली ची चिंता वाढण्याची शक्यता, टीम इंडियाच्या No 1 रँकिंगला धोका)
आता दोन्ही संघ टेस्ट मालिका काबीज करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. दोन्ही संघांकडे जागतिक स्तरावरील खेळाडू आहेत आणि पुढील तीन आठवड्यांमध्ये कोण कोणावर वरचढ होईल यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे. 'या' 5 खेळाडूंमधील काही रोमांचक लढत:
विराट कोहली (Virat Kohli)-कागिसो रबाडा (Kagiso Rabada)
भारतीय कर्णधार आणि दक्षिण आफ्रिकाई 'स्पीडस्टर' यांच्यातील लढत नक्कीच अपेक्षितांपैकी एक आहे. दोघे आयसीसी क्रिकेटच्या टेस्ट रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोन क्रिकेटपटूंनचा आक्रमक खेळ यंदाच्या मालिकेला रोमांचक बनवतात यात शंका नाही. 2015 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रबाडाने त्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट कोहलीच्या रूपात मिळवली होती. तेव्हापासून रबाडाने 38.81 च्या प्रभावी सरासरीने 150 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. कोहलीने 2017-18 मध्ये दोन्ही संघात झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तीन डावात एकूण 286 धावा केल्या होत्या आणि कोहली पुन्हा एकदा आफ्रिकाविरुद्ध तोच फॉर्म दर्शविण्याचा प्रयत्नात असेल. विराट आधीच क्रिकेटमधील एक उत्कृष्ट खेळाडूम्हणून उदयास आला आहे, अशा परिस्थितीत त्याच्याविरुद्ध खेळून स्वतःच्या खेळात सुधार करण्याची रबाडाला संधी असणार आहे.
डीन एल्गार (Dean Elgar)-रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)
रविचंद्रन अश्विन, डाव्या हाताच्या खेळाडूंविरुद्ध घातक सिद्ध झाला आहे. त्याच्या कारकीर्दीतील डावखुरा फलंदाजांच्या तुलनेत 25.43 च्या सरासरीने कमी झाली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने डेव्हिड वॉर्नर आणि अॅलिस्टर कूक सारख्या अव्वल फलंदाजांना प्रत्येकी 9 वेळा बाद केले आहेत. 2015 च्या मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर त्याने 11.13 च्या सरासरीने सर्वाधिक 31 विकेट्स घेतल्या होत्या. आणि आता वेस्ट इंडीजविरुद्ध दोन्ही कसोटी मॅचमधून वगळल्यानंतर, अश्विनला पुन्हा जुना प्रभाव पाडण्यासाठी उत्सुक असेल. दुसरीकडे, डीन एल्गार- दक्षिण आफ्रिकेचा सर्वात सुसंगत असा फलंदाज अश्विनविरुद्ध आपली खेळी सुधरवण्याचा प्रयत्न करेल. मागील 11 डावात अश्विनने एल्गारला 5 वेळा बाद केले आहेत. पण, अश्विनसाठी हे एवढे सोप्पे नसेल. एल्गारला परिस्थतीनुसार स्वतःच्या खेळात बदल करणे चांगलेच येते. एल्गारचे धैर्य आणि अश्विनची सूक्ष्म भिन्नता मालिकेत एक चुरशीची स्पर्धा निर्माण करेल यात शंका नाही.
फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)-रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
दक्षिण आफ्रिकेचा सर्वात अनुभवी क्रिकेटपटू डु प्लेसिसला त्याचे कौशल्य आणि अनुभव पणाला लावून खेळावे लागणार आहे.डु प्लेसिसने भारतीय मैदानावर त्याच्या खेळाचे कौशल्य दाखवून दिले आहे पण, मागील दौर्याच्या सात डावांमध्ये फक्त 60 धावा केल्या आहेत. फिरकी गोलंदाजीविरुद्ध तो सर्वात जास्त अपयशी ठरला आहे. आणि त्यात जडेजा त्याच्यासाठी सर्वात मोठा धोखादायक निर्माण झाला आहे. जडेजा, भारताचा प्रमुख अष्टपैलू टेस्ट खेळाडू संघासाठी महत्वाचा असणार आहे. घरच्या परिस्थितीत सामना जिंकावणाऱ्या जडेजाने 19.71 च्या सरासरीने 28 डावांत 144 विकेट्स घेतल्या आहेत.डु प्लेसिसविरुद्ध जडेजा कोहलीसाठी महत्वाचा गोलंदाज असणार आहे. डु प्लेसिस आणि जडेजा, आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्स कडून खेळतात.
केशव महाराज (Keshav Maharaj)-रिषभ पंत (Rishabh Pant)
गेल्या काही वर्षांपासून केशव महाराज आपल्या अचूक गोलंदाजीने रेड बॉल क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी एक नायक म्हणून उदयास आला आहे. मागील वर्षी महाराजने श्रीलंकाविरुद्ध सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत 129 धावा देत 9 गडी बाद केले. 2018 मध्ये महाराज, रबाडानंतर दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. केशवने 9 डावांत 34 गडी बाद केले होते. आणि आता भारत दौऱ्यावर तो पुन्हा एकदा फिरकीसाठी उपयुक्त अशा खेळपट्टीवर खेळताना जुन प्रदर्शन पुन्हा करून दाखवण्याच्या तयारीत असेल.
दुसरीकडे असेल टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत. पंत, जो फिरकी गोलंदाजांसमोर घातक खेळी करतो, अशा खेळाडूसमोर चेंडू टाकणे केशवला कदाचित कठीण होईल. मागील वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर पंतने 184 केल्या होत्या. पण, सध्या तो त्याच्या खेळीने प्रभाव पडण्यास यशस्वी राहिला नाही. अशा परिस्थितीत, आफ्रिकाविरुद्ध आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी पंत प्रयत्नात असेल. पंतची आक्रमक फलंदाजी आणि केशवची अचूक गोलंदाजी, या दोन युवा खेळाडूंमधील लढतीसाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.
वर्नोन फिलेंडर (Vernon Philander)-चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
फिलँडर आणि पुजारा दोघेही आपापल्या हस्तकलेत संयम, कौशल्य आणि शिस्त यांचे प्रतीक आहेत. पुजाराला 2017-18 मध्ये दक्षिण आफ्रिका दौर्यादरम्यान संघर्ष करावे लागले होते आणि त्याने सहा डावांमध्ये फक्त 100 धावा केल्या होत्या. डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल यांच्यासह कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीच्या वर्षांत बहरलेल्या फिलँडरने दक्षिण आफ्रिकेसाठी स्वतःला विजेता सिद्ध केले आहेत. शिवाय, 2012 मध्ये संघाला कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. त्याने कारकीर्दीत 48.6 च्या स्ट्राईक रेटने दक्षिण आफ्रिकेसाठी 200 हून अधिक कसोटी विकेट्ससह तिसर्या क्रमांकाचा मान मिळविला आहे. चेंडूला ऑफ स्टम्प करत अचूकपणे स्टंपवर टाकण्याची त्याची क्षमता त्याला घातक बनवते. आणि अशाच चेंडूला सामोरे जाताना पुजाराला संघर्ष करावा लागला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील तीन सामन्यांच्या मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. टीम इंडियाला टी-20 मालिका जिंकत मर्यादित षटकारांच्या क्रिकेट रेकॉर्ड करता आला नाही, पण टेस्टमध्ये भारत आपला विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. यंदाची टेस्ट मालिकादेखील आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत सध्या 120 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)