IND vs SA 3rd Test: कर्णधार विराट कोहली याच्या निशाण्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड, जाणून घ्या कोणाला टाकू शकतो पिछाडीवर

सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्याकडे लागून असतील. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विराटच्या निशाण्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड असतील.

विराट कोहली (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतिल तिसरा आणि शेवटची कसोटी उद्यापासून म्हणजेच शनिवारी रांचीमध्ये सुरू होणार आहे. रांचीमध्ये सुरु होणाऱ्या या मॅचमध्ये भारतीय संघ क्लीन-स्वीप करण्याच्या निर्धारित असेल तर आफ्रिकी संघ भारत दौरा विजय मिळवून संपवण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्याकडे लागून असतील. विराटने मागील सामन्यात शानदार डबल शतक ठोकले होते आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला होता. या मॅचमध्ये कोहलीला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. आणि अंतिम मॅचमध्येदेखील पुन्हा एकदा भारतीय कर्णधाराकडून मोठ्या डावाची अपेक्षित आहे. दुसऱ्या टेस्टप्रमाणे विराट फलंदाजीने पुन्हा जर कमाला करू शकला तर तो एकसाथ अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना पिछाडीवर टाकू शकतो. (IND vs SA 3rd Test: दक्षिण आफ्रिकेला अजून एक झटका; केशव महाराज नंतर एडन मार्क्रम ही Injured, आऊट झाल्यावर रागात हाताला करून घेतली होती दुखापत)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विराटच्या निशाण्यावर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड असतील.  1. कोहलीच्या निशाण्यावर सर्वात पहिले भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा विक्रम असेल. विराटने आतापर्यंत 81 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 7054 धावा केल्या आहेत. तर गांगुलीने 113 टेस्टमध्ये 7212 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे विराट सौरवच्या फक्त 158 धावामागे आहेत. या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये जर त्याने इतक्या धावा केल्या तर ते गांगुलीला मागे टाकू शकतो. यादरम्यान, तो ग्रेग चॅपल आणि स्टीफन फ्लेमिंग यांनाही मागे टाकू शकतो. चॅपल ने 87 मॅचमध्ये 7110 धावा आणि फ्लेमिंग ने 111 मॅचमध्ये 7172 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल गांगुलीच्या फक्त २ धावा पुढे आहे. गेलने 103 कसोटी सामन्यांमध्ये 7214 धावा केल्या आहेत.

2. भारत आणि दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये ६वा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्यासाठी कोहलीला 190 धावांची गरज आहे. यासह तो माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला मागे टाकेल. कोहलीने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध 1063 धावा केल्या आहेत, तर द्रविडने 1252 धावा केल्या आहेत.

3. आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये विराटने दुहेरी शतक केले होते. यासह त्याने गॅरी कर्स्टन आणि एबी डिव्हिलियर्स यांची बरोबरी केली होती.कर्स्टन आणिडिव्हिलियर्सने भारत-दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये एकूण 3 शतकं केली आहेत. आणि आता तिसऱ्या टेस्टमध्ये कोहली अजून एक शतक करतो तर हे त्याचे चौथे शतक असेल. यश तो मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin) याच्या रेकॉर्डची बरोबरी करेल. अझरुद्दीनने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यात 4 शतकं केली आहेत.

4. माजी ऑस्ट्रेलियाई क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) याच्या पुढे जाण्यासाठी विराटला अजून एका टेस्ट शतकाची गरज आहे. विराट आणि पॉन्टिंगने कर्णधार म्हणून 18 टेस्ट शतकं केली आहेत. आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या टेस्टमध्ये विराटने 26 वे टेस्ट शतक करत पॉन्टिंगची बरोबरी केली होती.

5. विराट आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांची मागील अनेक वर्षांपासून तुलना केली जात आहे. अ‍ॅशेस मालिकेतून टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्मिथने लवकरच टेस्ट रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळवले आणि विराटला दुसऱ्या क्रमांकावर ठकलले. दुसऱ्या टेस्टमध्ये दुहेरी शतकाचं विराटला योग्य असे फळ मिळाले आणि आता तो स्मिथच्या पहिल्या क्रमांकापासून फक्त २ गुण मागे आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये हे 2 गुण मिळवता विराट पुन्हा एकदा टेस्ट क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहचेल.

या मालिकेत यापूर्वी दोन सामने खेळले गेले आहेत आणि भारताने दोन्ही सामने जिंकत मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. यातील पहिल्या सामन्यात भारताने आफ्रिकेला 203 धावांनी पराभूत केले, तर दुसर्‍या सामन्यात भारताने डाव आणि 137 धावांनी विजय मिळविला. आता भारताची नजर तिसरा सामनाही जिंकण्यावर असेल. या सामन्यात भारतीय संघात काही बदल करता येतील, काही नवीन खेळाडूंना संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.



संबंधित बातम्या