IND vs SA 3rd Test: शाहबाझ नदीम याने घेतली लुंगी एनगीडी याची विचित्र विकेट, पाहून सर्व झाले आश्चर्यचकित, पहा Video

आणि यातील लुंगी एनगीडी यांची विकेट लक्षवेधी ठरली. नदीमने टाकलेला चेंडू एनगीडीने दुसऱ्या टोकाला उभा असलेला एनरिच नॉर्टजे याच्या दिशेला मारला. चेंडू नॉर्टजेच्या खांद्यावर लागला आणि नदीमच्या दिशेने उडाला. नदीमने चेंडू मिस केला नाही आणि सुरक्षितपणे झेल पकडला.

शाहबाझ नदीम, लुंगी एनगीडी (Photo Credit: IANS/Getty)

विराट कोहली याच्या नेतृत्वात भारतीय संघाने (Indian Team) रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर झालेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 202 धावांनी पराभूत केले आणि सलग तिसरा विजय मिळविला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजय मिळविला. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारताचा हा सर्वात मोठा विजय होता. आणि आफ्रिकाविरुद्ध पहिल्यांदा कसोटी मालिकेत क्लीन-स्वीप मिळवण्यासाठी भारताने दमदार कामगिरी होती. सुरुवातीपासून भारताने वर्चस्व राखले होते आणि फलंदाजीसह गोलंदाजीने विरोधी पक्षावर दबाव बनवून ठेवला होता. फलंदाजांसह गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी बजावली. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांनी सर्वाधिक अनुक्रमाने 13 आणि 11 विकेट घेतल्या. याशिवाय, तिसऱ्या सामन्यात भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या शाहबाझ नदीम यानेही पदार्पणाच्या मॅचमध्ये प्रभावी कामगिरी केली. (IND vs SA Test: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये दिसला एम एस धोनी, शाहबाझ नदीम याला दिला गुरु मंत्र)

दक्षिण आफ्रिकाविरुद्ध नदीमने पहिल्या डावात 2 गडी बाद केले. त्यानंतर भारताने आफ्रिकेला फॉलोऑन दिल्यावर नदीमने आफ्रिकेचे शेवटचे दोन विकेट घेतले. आणि यातील लुंगी एनगीडी यांची विकेट लक्षवेधी ठरली. दिवसाच्या त्याच्या पहिल्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर नदीमने थेयूनिस डी ब्रुयन याला रिद्धिमान साहाच्या हाती झेल बाद केले. त्यानंतर, एनगीडी नाट्यमय पद्धतीने बाद झाला. नदीमने टाकलेला चेंडू एनगीडीने दुसऱ्या टोकाला उभा असलेला एनरिच नॉर्टजे याच्या दिशेला मारला. चेंडू नॉर्टजेच्या खांद्यावर लागला आणि नदीमच्या दिशेने उडाला. नदीमने चेंडू मिस केला नाही आणि सुरक्षितपणे झेल पकडला. यांच्यानंतर एनगीडीला आऊट देण्यात आले. पहा याचा हा व्हिडिओ:

एकाद्या भारतीय फिरकीपटूने पकडलेला हा सर्वात विचित्र झेलपैकी एक आहे. दरम्यानएनगीडी आऊट होताच दक्षिण आफ्रिकेचा डाव 133 धावांवर संपुष्टात आला. आणि भारताने एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. यासह भारताने आफ्रिकेचा टेस्ट मालिकेत पहिल्यांदा व्हाईट वॉश केला.