IND vs SA 3rd Test Day 2: रोहित शर्मा याचा डबल धमाका, टेस्ट कारकिर्दीत पहिल्यांदाच झळकावले दुरेही शतक

2013 साली टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचे टेस्टमधील हे पहिले दुहेरी शतक आहे.

रोहित शर्मा (Photo Credits: IANS)

कसोटी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध सध्या सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट सामन्यात दुहेरी शतक केले. 2013 साली टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहितचे टेस्टमधील हे पहिले दुहेरी शतक आहे. रोहितने रोहितने षटकार मारत 249 चेंडूत द्विशतक पूर्ण केले.  यापूर्वी टेस्टमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 177 आहे. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध यापूर्वी सर्वाधिक 177 धावा केल्या होत्या. भारतीय संघात (Indian Team) सलामी फलंदाजी करत असलेला रोहित टेस्ट संघात मधल्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. पण, यंदाच्या आफ्रिकाविरुद्ध मेलेत त्याला टेस्टमध्ये देखील पहिल्यांदा डावाची सुरुवात करायची संधी मिळाली. आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला. यापूर्वी, रोहितने आफ्रिकाविरुद्ध पहिल्या टेस्टमध्ये 176 धावा केल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात 127 धावा केल्या. (IND vs SA 3rd Test: रोहित शर्मा याचे 6 वे टेस्ट शतक; मोहम्मद अझरुद्दीन, वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर करत आफ्रिकाविरुद्ध मालिकेत केल्या 400 धावा)

या दुहेरी शतकासह रोहितचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा आणि 'रन-मशीन' विराट कोहली (Virat Kohli) यासारख्या अन्य क्रिकेटपटूंच्या यादीत समावेश झाला आहे. रोहितचे हे पहिले दुहेरी शतक आहे तर सचिन-सेहवाग यांने प्रत्येकी 6 दुहेरी शतकं केली आहे. यापूर्वी, विराटने रेकॉर्ड 7 दुहेरी शतकांचा रेकॉर्ड नोंदवला आहे. यापूर्वी भारताने दोन्ही टेस्ट सामने जिंकत मालिका जिंकली आहे. त्यामुळे, रांची टेस्ट सामना जिंकत भारत क्लीन-वॉशच्या प्रयत्नात आहे. सध्या दुसऱ्या दिवशी भारताने रोहित आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या दमदार फलंदाजीने वर्चस्व राखले आहे. रोहित सनी राहणेंमध्ये 267 धावांची भागीदारी झाली.

दरम्यान, यंदाच्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मालिकेतील हे तिसरे दुहेरी शतक आहे. यापूर्वी मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि विराटने दुहेरी शतक केले होते.