IND vs SA 3rd t20 Match Timing Changes: भारत-दक्षिण आफ्रिकेमधील तिसरा टी-20 सामना उशिराने सुरू होणार; जाणून घ्या नेमकी वेळ?

हा सामना सेंच्युरियनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पण या सामन्याची वेळ उशीरा ठेवण्यात आली आहे.

Photo Credit- X

India vs South Africa 3rd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या चार सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट राखून भारताचा पराभव केला होता. आता तिसरा सामना उद्या म्हणजे 13 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना सेंच्युरियनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. पण या सामन्याची वेळ उशीरा ठेवण्यात आली आहे. (हेही वाचा:South Africa Beat Team India, 2nd T20I Match Scorecard: दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 3 गडी राखून केला पराभव, जेराल्ड कोएत्झी - ट्रिस्टन स्टब्सची शानदार खेळी )

सेंच्युरियन मैदानावरील रेकॉर्ड

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाचे फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत. 100 धावांचा टप्पा पार करण्यात संघ कसा तरी यशस्वी झाला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिके समोर 124 धावांचे लक्ष ठेवले होते. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने 4 षटकात 17 धावा देत 5 विकेटही घेतले. पण भारताने हा सामना गमावला. सेंच्युरियन मैदानावर आतापर्यंत एकूण 16 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 8 सामने जिंकले आहेत. तर 7 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. संघाने 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 259 धावा केल्या होत्या.

भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याची वेळ काय?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या सामन्याची वेळ उशीराची आहे. दुसरा टी-20 सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाला होता. मात्र तिसऱ्या टी-20 सामन्याच्या वेळेत बदल झाला आहे. हा सामना एका तासाने उशिरा म्हणजे भारतीय वेळेनुसार 8.30 वाजता सुरू होईल. या सामन्याची नाणेफेक रात्री 8 वाजता होईल. त्यामुळे हा सामना रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif