IND vs SA 2nd Test Day 1: मयंक अग्रवाल याचे सलग दुसरे शतक, केली 'या' विक्रमांची नोंद
या शतकासह मयंकने अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. 2009-10 मध्ये वीरेंद्र सेहवाग यांच्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मागोमाग दोन शतक झळकावणारा मयंक हा फक्त दुसरा भारतीय सलामीवीर ठरला.
भारताचा (India) नवीन सलामीवीर मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याने दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी शानदार शतक केले. पुणे कसोटीत रोहित शर्मा (Rohit Sharma) बरोबर डावाची सुरुवात करणारा मयंकने खेळपट्टीची मनस्थिती जाणून खेळू लागला. रोहितच्या लवकर बाद झाल्यानंतर त्याने पुजाराशी भारतीय डाव बरोबरीत रोखला आणि 138 धावांची भागीदारी केली. यापूर्वी, विशाखापट्टणम कसोटीत मयंकने दुहेरी शतक झळकावले होते. त्याच्या सहाव्या कसोटी सामन्यात 28 वर्षीय मयंकने कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. या शतकासह मयंकने अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. 2009-10 मध्ये वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याच्यानंतर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मागोमाग दोन शतक झळकावणारा मयंक हा फक्त दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. (IND vs SA 2nd Test Day 1: तशी 142 किमी वेगाने जीवघेणा बाउन्सर हेल्मेटवर आदळला, तरीही मयंक अग्रवाल याने ठोकले अर्धशतक, पहा व्हिडिओ)
पहिल्या कसोटीच्या दुसर्या डावात 7 धावांवर बाद झालेला मयंक पुन्हा एकदा पुण्यात चर्चेत आला आहे. या शतकासह यावर्षी कसोटी सामन्यात 450 धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. शिवाय, त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 धावांचा टप्पादेखील ओलांडला. घरच्या मैदानावरील दुसर्या सामन्यात हे मयंकचे कारकीर्दीतील दुसरे कसोटी शतक होते. यावर्षी कसोटीत 50 चौकार ठोकणाऱ्यांच्या फलंदाजांमध्ये देखील मयंक पुढे गेला. असे करणारा तो पहिला भारतीय आहे.
दरम्यान, अग्रवाल शंभर धावा करून बाद झाला. कगिसो रबाडा याने त्याला माघारी धाडले. अग्रवालने आपल्या डावात 16 चौकार आणि 2 षटकार लगावले आणि 108 धावा केल्या. मयंकने 183 व्या वर्नोन फिलेंडर याच्या चेंडूवर चौकार ठोकत शतक पूर्ण केले. तत्पूर्वी, पहिल्या कसोटी मॅचच्या पहिल्या डावात मयंकने दुहेरी शतक झळकावले. येथे त्याने प्रभावी 215 धावा फटकावल्या आणि त्याचे पहिले कसोटी शतकाचे दुहेरीत शतकात रूपांतर केले.