IPL Auction 2025 Live

IND vs SA 2nd Test 2019: कर्णधार विराट कोहली याच्या जबरदस्त दुहेरी शतकांबद्दल अनुष्का शर्मा ने दिली 'ही' प्रतिक्रिया, पहा Photo

विराटच्या या खेळीवर चाहत्यांसह त्याची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीदेखील प्रभावित झालेली दिसली. अनुष्काने सोशल मीडियाद्वारे विराटच्या रेकॉर्ड दुहेरी शतकाबद्दल प्रतिक्रिया देत आपले प्रेम व्यक्त केले.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Photo Credit: Twitter)

भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिका (South Africa) विरूद्ध सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट नाबाद 254 धावांची खेळी केली आणि अनेक विक्रम नोंदवले. भारतीय कर्णधाराने खेळाच्या प्रदीर्घ स्वरुपात आपले सातवे दुहेरीशतक पूर्ण केले. यामुळे भारताने 5 बाद 601 धावांवर पहिला डाव घोषित केला. या दुहेरी शतकाच्या खेळीदरम्यान रन-मशीन विराटने डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे रेकॉर्ड मोडले. कोहलीने टेस्ट करिअरमधील 7000 धावांचा टप्पा गाठला आणि ही कामगिरी करणारा सचिन आणि वीरेंद्र सेहवाग याच्यानंतर तिसरा भारतीय बनला. सध्या सुरू असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध कोहलीने शुक्रवारी पुण्यात शानदार शतक झळकावत 2019 च्या कसोटी शतकाचा दुष्काळ संपवला. असे करताना कोहलीने 26 वे कसोटी शतक ठोकले. कोहलीने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन याना मागे टाकले आणि कर्णधार म्हणून सर्वात जास्त दीडशे आणि त्याहून अधिक धावा केल्या. विराटच्या या खेळीवर चाहत्यांसह त्याची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का (Anushka Sharma) शर्मा हीदेखील प्रभावित झालेली दिसली. (IND vs SA 2nd Test 2019: भारत-दक्षिण आफ्रिका दुसऱ्या टेस्टदरम्यान विराट कोहली सह या खेळाडूंनी बनवले 'हे' प्रमुख रेकॉर्ड, वाचा सविस्तर)

अनुष्काने सोशल मीडियाद्वारे विराटच्या रेकॉर्ड दुहेरी शतकाबद्दल प्रतिक्रिया देत आपले प्रेम व्यक्त केले. अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर कोहलीचा फोटो शेअर केले आणि त्याच्यावर हृदयची इमोजी जोडली.

(Photo Credit: Instagram)

कोहली व्यतिरिक्त अष्टपैलू रवींद्र जडेजा याने 91 धावा फटकावल्या आणि पुण्यात दक्षिण आफ्रिकाविरुद्ध दुसर्‍या मॅचमध्ये प्रभुत्व मिळवले. शेवटी कोहली33 चौकार आणि दोन षटकारांसह 254 धावांवर नाबाद राहिला आणि संघाने 601/5 अशी मजल मारल्यानंतर भारताने डाव घोषित केला. याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाने दिवसाचा खेळ संपला तेव्हा 3 बाद 39 धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी आफ्रिका संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल तर टीम इंडिया गोलंदाजीने आफ्रिकी फलंदाजांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील.