IND vs SA Test 2019: घरच्या मैदानावर टीम इंडियाला स्पर्धा देण्यासाठी व्हीव्हीस लक्ष्मण-ग्रीम स्मिथ यांनी निवडली 'ही' Playing XI, पहा कोणाचा केला समावेश

टीम इंडियाच्या वर्चस्वामुळे माजी आफ्रिकी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आणि माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी जागतिक स्तरावरच्या प्लेयिंग इलेव्हनची निवड केली आहे जी टीम इंडियाला त्यांच्या घरच्या मैदानावर स्पर्धा देऊ शकेल.

भारत-दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: PTI)

घरातील खेळपट्ट्यांवरील कसोटींमध्ये भारतीय क्रिकेट संघ (Indian Team) सध्या अविश्वसनीय खेळ करताना दिसत आहे. टीम इंडियाचा मागील 32 टेस्ट सामन्यात फक्त एक पराभव झाला आहे, तर सलग 11 टेस्ट मालिका जिंकण्याचा विश्वविक्रमही त्यांनी केला. सध्या, भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघात रांचीमध्ये तिसरा टेस्ट सामना सुरु आहे. आणि पहिल्या दोन्ही सामन्याप्रमाणे भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यातही आपले वर्चस्व राखले आहे. सलामी फलंदाज रोहित शर्मा याने टेस्टमधील पहिले दुहेरी शतक केले. यापूर्वी मयंक अग्रवाल आणि कर्णधार विराट कोहली यांनीही दुहेरी शतक केले होते. मालिकेतील फलंदाजांसह भारतीय गोलंदाजांनीही एक अप्रतिम खेळ दाखवला. मागील सामन्यात भारताने फॉलोऑन देत गोलंदाजांनी आफ्रिका संघाला एका दिवसात बाद केले होते. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या वर्चस्वामुळे माजी आफ्रिकी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) आणि माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी जागतिक स्तरावरच्या प्लेयिंग इलेव्हनची निवड केली आहे जी टीम इंडियाला त्यांच्या घरच्या मैदानावर स्पर्धा देऊ शकेल. (IND vs SA 3rd Test: उमेश यादव याने दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ठोकले एकापाठोपाठ 5 षटकार, विराट कोहली ही झाला अवाक, पहा Video)

या दोघांनी मिळून विश्व क्रिकेटमधील खेळाडूंचा समावेश करत एक संघ निवडला आहे जो टीम इंडियाला भारतात आव्हान देऊ शकेल. यात सध्या सर्वात उल्लेखनीय फलंदाज केन विल्यमसन आणि स्टीव्ह स्मिथ आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे हे स्फोटक फलंदाज जगातील कोणत्याही खेळपट्टीवर धावा करण्यात सक्षम आहे. यांच्याव्यतिरिक्त संघात दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू-  डीन एल्गार आणि क्विंटन डी कॉक यांचाही समावेश आहे. एल्गार आणिडी कॉकने पहिल्या टेस्टमध्ये शतकी खेळी केली होती. शिवाय, मधल्या फलित फलंदाजी करण्यासाठी स्मिथ आणिविल्यमसनसह पाकिस्तानचा बाबर आझम आणि बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन अनुक्रमे 5 आणि 6 व्या स्थानावर आहे. तर, 7  व्या क्रमांकावर, इंग्लंडचा अ‍ॅशेस नायक बेन स्टोक्स आहे. स्टोक्सने विश्वचषकसहअ‍ॅशेसमधेही लक्ष्यवेधी खेळी केली होती. गोलंदाजांबद्ल बोलले तर, स्मिथ आणि लक्ष्मणने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, इंग्लंडचा आगामी प्रतिभावान वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ऑस्ट्रेलिया अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याचा समावेश केला आहे.

लक्ष्मण आणि स्मिथचं टीम इंडिया विरुद्ध प्लेयिंग इलेव्हन: डीन एल्गार, तमीम इक्बाल, केन विल्यमसन, स्टीव्ह स्मिथ, बाबर आजम, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, क्विंटन डी कॉक, पॅट कमिन्स, जोफ्रा आर्चर आणि नॅथन लायन.