IND vs SA 1st Test: 5 विकेट घेत मोहम्मद शमी ने रचला इतिहास; भारतीय गोलंदाजांच्या 'या' Elite यादीत झाला समावेश
शमी, 23 वर्षानंतर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 5 विकेट घेणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे.
विशाखापट्टणमच्या एसीए-व्हीसीए स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या शानदार गोलंदाजीवर भारताने दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा 203 धावांनी धुव्वा उडवला. यासह, तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही भारताने 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. शमीने शानदार गोलंदाजी केली आणि दुसर्या डावात 35 धावा देऊन 5 गडी बाद केले. यासह त्याने एक खास विक्रम आपल्याणांवर केला. 395 धावांच्या लक्ष्याचा बचाव करताना, भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी शमीने चौथ्यांदा टेस्ट क्रिकेटमध्ये एका डावात 5 गडी बाद केले. शमी, 23 वर्षानंतर कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात 5 विकेट घेणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज बनला आहे. यापूर्वी 1996 मध्ये जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) यांनी ही कामगिरी केली होती. (IND vs SA 1st Test 2019: मोहम्मद शमी याच्या सर्वोत्तम इनस्विंजरवर फाफ डु प्लेसिस ची उडाली दांडी, फलंदाजीही राहिला स्तब्ध, पहा Video)
माजी डावखुरा वेगवान गोलंदाज करसन घावरी (Karsan Ghavri) याने 1977 मध्ये इंग्लंडविरुद्ध मुंबईत प्रथम ही कामगिरी केली होती. त्यानंतर, भारताचा माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी 1981 मध्ये मुंबईत इंग्लंडविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्याच वर्षी मदन लाल (Madan Lal) आणि 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरूद्ध हा विक्रम नोंदविणारा शेवटचा चौथा आणि शमीआधी अखेरचा वेगवान गोलंदाज श्रीनाथ होता. याशिवाय एका कसोटी डावात चार खेळाडूंना बोल्ड करून बाद करणारा तो भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने वेस्ट इंडिजविरुद्ध हा पराक्रम केला होता. आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात भारतासाठी शमीने टेंबा बावुमा, फाफ डु प्लेसिस, क्विंटन डी कॉक आणि अखेरीस डेन पीट यांना बोल्ड करून संघाचा विजय निश्चित केला.
View this post on Instagram
When @mdshami.11 strikes 😮😮 #TeamIndia #INDvSA
A post shared by Team India (@indiancricketteam) on
रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांची शानदार फलंदाजी आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांच्या घटक गोलंदाजीच्या जोरावर विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 3 सामन्याच्या टेस्ट मालिकेत विजयी सलामी दिली. आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या डावात भारताकडून शमीव्यतिरिक्त अश्विनने 1, जडेजाने 4 गडी बाद केले. दरम्यान, दोन्ही संघातील दुसरा सामना पुणेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जाईल. आणि त्यानंतर, अखेरचा सामान रांची मध्ये होईल.