IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन किल्ला भेदणारा टीम इंडिया फक्त तिसरा पाहूणा संघ, जाणून घ्या कोण आहेत अन्य दोन
सेंच्युरियनमध्ये 28 कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका पराभूत होण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. तर 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतल्याने रेनबो नेशनमधील आशियाई दिग्गजांचा चौथा कसोटी विजय आहे.
IND vs SA 1st Test 2021: भारताने गाब्बा (Gabba) येथे ऑस्ट्रेलियाचा (Australia) किल्ला किल्ला भेदल्याच्या 11 महिन्यांनंतर विराट कोहलीच्या टीम इंडियाने (Team India) सेंच्युरियनमध्ये (Centurion) दक्षिण आफ्रिकेच्या किल्ल्याचा सर केला आणि सुपरस्पोर्ट पार्कमध्ये त्यांचा पहिला-वहिला कसोटी विजय नोंदवला. भारताने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 113 धावांनी धुव्वा उडवला आणि शेवटच्या 6 विकेट्स घेत ऐतिहासिक विजय मिळवला. 1992 पासून दक्षिण आफ्रिकेतील 22 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचा हा केवळ चौथा विजय आहे. भारताने (India) दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत एका नंतर दुसऱ्यांदा आघाडी घेतली आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या 2006-07 दौऱ्यावर राहुल द्रविडच्या नेतृत्वातील संघाने 1-0 ने आघाडी घेतली होती पण अखेरीस 3 कसोटींची मालिका 1-2 ने गमावली. (IND vs SA: सेंच्युरियन कसोटी जिंकल्यानंतर स्टँडमध्ये बसलेल्या मुलगी Vamika कडे पाहून बाबा विराट कोहलीने दिली अशी रिअक्शन, पहा व्हिडिओ)
दरम्यान, सेंच्युरियनमध्ये कसोटी विजयाची नोंद करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी 2018 दौऱ्यावर सुपरस्पोर्ट पार्कमध्ये कोहलीची टीम अयशस्वी ठरली होती. तर एमएस धोनीच्या नेतृत्वात संघ सेंच्युरियनमध्ये खेळला होता परंतु अनिर्णित मालिकेत याच प्रतिष्टीत मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना एक डाव आणि 25 धावांनी पराभव पत्करावा लागला. पण उल्लेखनीय आहे सर्वात वेगवान खेळपट्ट्या तयार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ठिकाणी कसोटी जिंकणारा विराट कोहलीची टीम इंडिया, इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) नंतरचा तिसरा पाहुण्या संघ ठरला आहे. 2000 मध्ये सेंच्युरियन येथे कसोटी सामना जिंकणारा इंग्लंड हा पहिला पाहुण्या संघ होता.
दोन्ही संघात या मैदानावर एक नाट्यमय सामना रंगला होता ज्यामध्ये दोन्ही संघांनी एक-एक डाव गमावला आणि चित्तथरारक सामन्याची नोंद केली. तथापि, नंतर हॅन्सी क्रोनिए कसोटी सामन्यात मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचे आढळले, ज्याचे तीन दिवस पावसामुळे धुवून गेले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने 2014 मध्ये सेंच्युरियनमध्ये त्यांचा पहिला-वहिला कसोटी सामना जिंकला. स्टीव्ह स्मिथ, शॉन मार्श आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शतकांमुळे मायकेल क्लार्कच्या नेतृत्वात संघाने यजमानांचा 281 धावांनी पराभव केला. एकूणच, दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियनमध्ये 28 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 21 जिंकल्या आहेत आणि फक्त 3 गमावल्या असून यामध्ये आता भारताच्या ऐतिहासिक विजयाचा देखील समावेश आहे.