IND vs SA 1st Test Day 4: टीम इंडियाचा दुसरा डाव 323/4 वर घोषित, दक्षिण आफ्रिकेला दिले 395 धावांचे लक्ष्य; चौथ्या दिवसाखेर आफ्रिका 11/1

भारताला विजयासाठी अजून 9 विकेट्स ची गरज आहे. टीम इंडियाने पहिल्या टेस्टचा दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला. आणि आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघ (Photo Credit: Getty)

टीम इंडियाने पहिल्या टेस्टचा दुसरा डाव 4 बाद 323 धावांवर घोषित केला. आणि आफ्रिकेला विजयासाठी 395 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. भारतीय संघा (Indian Team) साठी रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पुन्हा एकदा शतकी खेळी केली. शनिवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध सलामीच्या कसोटीच्या चौथ्या दिवशी लंचपर्यंत दुसर्‍या डावात एक गडी गमावल्यानंतर भारताने 35 धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी अजून 9 विकेट्स ची गरज आहे. पण, आफ्रिकी गोलंदाजांनी सुरुवातीलाच भारताला मोठा धक्का दिला. आणि मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) याला स्वस्तात माघारी धाडले. पहिल्या डावात दुहेरी शतक करणारा मयंक दुसऱ्या डावात 7 च धावा करू शकला आणि केशव महाराज (Keshav Maharaj) याच्या गोलंदाजीवर फाफ डु प्लेसिस याच्या हाती झेल बाद झाला. पण, रोहितने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याच्या साथीला तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) मैदानावर आला. (IND vs SA 1st Test Day 4: रोहित शर्मा याचे सलामीला येत दुसरे शतक, 'हे' 3 रेकॉर्ड करत रचला इतिहास)

रोहितने सुरुवातीपासून मोठे शॉट्स खेळणे सुरु केले आणि आफ्रिकी गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. यादरम्यान, रोहितने 11 वे अर्धशतक पूर्ण केला. रोहितने पहिल्या डावातील फॉर्म सुरूच ठेवला. रोहितने नंतर त्याचे पाचवे टेस्ट शतक पूर्ण केले आणि अनेक विक्रमांना गवसणी घातली. एकीकडे रोहित मोठे शॉट्स खेळत होता, तर पुजारा त्याला चांगली साथ देत होता आणि रोहितला फलंदाजीला जास्तीत जास्त संधी देत होता. पुजारा 81 धावांवर बाद झाला. रोहितने दुसऱ्या डावात 149 चेंडूत 10 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 127 धावा फटकावल्या. रोहित दुसऱ्या डावात केशव महाराजच्या चेंडूवर झेलबाद झाला. विशेष म्हणजे सामन्याच्या पहिल्या डावात रोहितला फिरकी गोलंदाज महाराजने झेलबाद केले होते. यासह, रोहित कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये स्टंप आऊट होणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

त्यानंतर, पुजारा बाद झाल्यावर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) फलंदाजीसाठी आला. जडेजाने देखील रोहितच्या साथीने मोठे शॉट्स लागले. रोहित बाद होताच कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजीसाठी आला. पण, जडेजा त्याला जास्त साथ देऊ शकला नाही आणि 40 धावा करत बाद झाला. कोहली 31, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे 27 धावांवर नाबाद राहिले. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जडेजाने भारताला एक मोठे यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या डावात दीडशे धाव करणारा डीन एल्गार (Dean Elgar) 2 धावा करून बाद झाला.