IND vs SA 1st Test Day 2: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मयंक अग्रवाल-रोहित शर्मा यांनी ओपनिंग भागीदारीत केल्या सर्वाधिक धावा, स्पेशल क्लबमध्ये मिळवले स्थान
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्या टेस्ट मध्ये पहिल्यांदा रोहित शर्मा आणि मयंक अग्रवालने दुसऱ्या दिवशी खेळ 202 च्या पुढे सुरु करत रोहित आणि मयंकने सुरुवातीला 17 धावा करत दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी केली.
दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध पहिल्या टेस्ट मध्ये पहिल्यांदा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) यांनी भारतासाठी डावाची सुरुवात केली. 47 वर्षांत प्रथमच नवीन सलामी जोडी भारतीय मैदानात खेळायला उतरली. मयंक आणि रोहितने पहिल्याच मॅचमध्ये द्विशतकी भागीदारी केली. पहिल्या दिवशी चहापाण्यापूर्वी दोघांनीही 200 धावांची धावसंख्या गाठली. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विशाखापट्टणममध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता रोहित आणि मयंक यांनी कर्णधाराचा निर्णय योग्य सिद्ध केला आणि चहाच्या वेळी भारताची संघाची धावसंख्या 202 होती. या द्विशतकी भागीदारीसह रोहित आणि मयंक, या जोडीने एक विशिष्ट रेकॉर्ड केला. (IND vs SA 1st Test 2019: दक्षिण अफ्रिका संघाविरुद्ध रो'हिट' शर्मा याची शतकी खेळी; चाहत्याला आठवला चार वर्षांपूर्वीचा इतिहास)
पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे लवकर संपवण्यात आला. आणि दुसऱ्या दिवशी खेळ 202 च्या पुढे सुरु करत रोहित आणि मयंकने सुरुवातीला 17 धावा करत दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सर्वाधिक ओपनिंग भागीदारी केली. रोहित आणि मयंकने 2019 धावांची भागीदारी केली आणि वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या 218 धावांच्या भागीदारीचा रेकॉर्ड मोडला. सेहवाग-गंभीरने 2004-05 कानपुरमध्ये आफ्रिकाविरुद्धपहिल्या विकेटसाठी 218 धावांची भागीदारी केली होती.
दुसरीकडे, आफ्रिकाविरुद्ध दुसऱ्या दिवशी मयंकने टेस्ट करिअरमधील पहिले शतक पूर्ण केले. मयंक भारतातील पहिला कसोटी सामना खेळत आहे आणि पहिल्याच घरच्या मॅचमध्ये मयंकने शतक ठोकले आहे. मयंकने दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध या सामन्यात 204 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार लगावून पहिले शतक पूर्ण केले आहे. यापूर्वीही मयंकने तीन अर्धशतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. डिसेंबर 2018 मध्ये भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या मयंकची भारताच्या विश्वचषक 2019 संघात बदली म्हणून निवड झाली होती, पण त्याला एकही सामना खेळात आला नाही.