IND vs PAK क्रिकेट मालिकेवर BCCI ने सोडले मौन, भारत सरकारच्या अनुमतीशिवाय खेळण्यास दिला नकार
आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय मंडळाचे प्रतिनिधीत्व करणारे वकीलांनी खरे चित्र मांडले आणि आंतरराष्ट्रीय संघटनेने त्या परिस्थितीला समजून घेतले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयसीसीला महिला वनडे चँपियनशिपमध्ये पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) खेळण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळणे अपयशी ठरल्याचे सांगितले. आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय मंडळाचे प्रतिनिधीत्व करणारे वकीलांनी खरे चित्र मांडले आणि आंतरराष्ट्रीय संघटनेने त्या परिस्थितीला समजून घेतले. आयसीसीने (ICC) दिलेल्या निवेदनात म्हटले की, "भारत (India)-पाकिस्तान महिला (Pakistan Women's) मालिका जुलै ते नोव्हेंबर 2019 दरम्यान या स्पर्धेच्या सहाव्या फेरीमध्ये निश्चित करण्यात आली होती, परंतु दोन्ही बोर्डांचे उत्तम प्रयत्न असूनही ते होऊ शकले नाहीत, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. बुधवारी भारताने 2021 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. "आमच्या वकिलांनी आयसीसीला स्पष्ट केले की प्रत्येक स्पर्धेसाठी आम्ही सरकारची परवानगी घेतो आणि फक्त पाकिस्तानसाठी नाही. आणि जर आम्हाला सरकारकडून मंजुरी मिळाली नाही तर आम्ही ते कसे करू? ते फक्त परिस्थिती स्पष्ट करण्याबद्दल होते," असे अधिकाऱ्यांनी आयएएनएसला सांगितले. (Women’s World Cup 2021: वर्ल्ड कप 2021 साठी भारतीय महिला क्रिकेट संघाचे स्थान निश्चित; 6 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान खेळले जाणार सामने)
“भारत विरुद्ध पाकिस्तान मालिकेच्या संदर्भात टीसीने असा निष्कर्ष काढला की, आयसीसी महिला चँपियनशिपचा एक भाग असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत भारताला भाग घेता यावा यासाठी आवश्यक असणारी सरकारची मंजूरी मिळू शकली नाही, हे बीसीसीआयने दाखवून दिल्यानंतर फोर्स मॅजेयर कार्यक्रमामुळे ही मालिका खेळता आली नाही.” मीडिया विधानात म्हटले.
विशेष म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख एहसान मनी यांनी मंगळवारी हे स्पष्ट केले की पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला करण्यासाठी बीसीसीआयची गरज नाही. "आमचे नुकसान झाले पण ते (भारत) आमच्या विचारात किंवा योजनेत नाहीत." पीसीबीच्या माध्यम विभागाने प्रसिद्ध केलेल्या पॉडकास्टमध्ये ते म्हणाले की, "आम्हाला त्यांच्याशिवाय जगावे लागेल आणि जगण्याची आम्हाला गरज नाही. मी स्पष्ट आहे की जर भारत खेळायचा नसेल तर त्यांच्याशिवाय योजना आखली पाहिजे. मी स्पष्ट आहे की जर भारत खेळायचा नसेल तर त्यांच्याशिवाय योजना आखली पाहिजे. एकदा किंवा दोनदा त्यांनी आमच्याविरुद्ध खेळण्याची आश्वासने दिली आहेत पण शेवटच्या क्षणी त्यांना हाथ खेचून घेतले."