IND vs PAK, CWC 2019: केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या ट्विट वर पाकिस्तानचं प्रत्युत्तर, Stay Surprise म्हणत लगावला टोला
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताच्या विजयाची तुलना पाकिस्तान वरील स्ट्राईकशी केलेल्या ट्विट वर आता पाकिस्तान कडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
आयसीसी विश्वचषक (ICC World Cup) दौऱ्यात भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दणदणीत विजय झाला, यावेळी सर्वच माध्यमातून विराट ब्रिगेडच्या शिलेदारांवर कौतुकाचा वर्षाव होत होता. अशातच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भारताचा सामन्यातील खेळ हा पाकिस्तान (Pakistan) वरील आणखीन एक स्ट्राईक आहे असे म्हणत टीम इंडियाचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले होते. शहा यांच्या ट्विट ला पाकिस्तानचे विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्स महासंचालक आसिफ गफूर (Asif Ghafoor) यांनी ट्विटवरून प्रत्युत्तर दिले आहे.
अमित शहा यांनी ट्विटरवर ही प्रतिक्रिया देताना टीम इंडियाच्या खेळाचं कौतुक करत टीम इंडियाने पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक केला आणि यापूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईक सारखाच परिणाम याहीवेळेस झाला आहे. संपूर्ण टीम इंडियाचं अभिनंदन. तुमची कामगिरी उत्तम होती. भारताच्या प्रत्येक नागरिकाला या विजयाबद्दल अभिमान वाटेल", असं म्हटलं होत. यानंतर उत्तर म्हणून गफूर यांनी ट्विट करून उत्तर दिले आहे.
आसिफ गफूर ट्विट
आसिफ गफूर यांच्या ट्विट मध्ये त्यांनी सुरवातीला टीम इंडियाने चांगला खेळ खेळून पाकिस्तानचा पराभव केल्याचे मान्य केले. पण म्ह्णून अमित शहा यांनी या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राईकशी करण्याची गरज नाही, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही असे देखील गफूर यांनी म्हंटले आहे. यापुढे मात्र आपला सूर खोचक करून गफूर यांनी जर का शहा यांना तुलना करायची असेल तर त्यांनी आमच्या नोहेरा काउंटर स्ट्राइकचा परिणाम आणि आयएएफ उल्लंघन केल्याप्रकरणी 27 फेब्रुवारीला भारताची दोन विमाने पाडल्याचा प्रसंग आठवावा असे म्हणत "Stay Surprise" असा टोला दिला आहे.
ICC Cricket World Cup 2019: टीम इंडिया मधील 'हा' सलामीवीर बनू शकतो 'मॅन ऑफ द टूर्नामेंट'
टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्याआधीपासूनच दोन्ही देशांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दृष्टीने दोन्ही देशातील जाहिरातींमार्फत युद्ध सुरु होत. भारताने मौका मौका थीम वर बनवलेल्या जाहिरातीला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्यासारख्या एका व्यक्तीला दाखवत आपणच जिंकणार असा अवाजवी विश्वास दाखवला होता, पण सामन्यात मात्र पाकिस्तानच्या संघाचा चांगलाच धुव्वा उडाला होता.