IND vs NZ 2nd Test 2024: पुणे कसोटीत रोहित शर्मा इतिहास रचणार, वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम मोडीत काढणार
त्याचे लक्ष्य माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग असेल. ज्याने भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सध्या सुरू असलेल्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर होणार आहे. 24 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मोठा विक्रम करू शकतो. त्याचे लक्ष्य माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग असेल. ज्याने भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. रोहित शर्माने पुणे कसोटीत 4 षटकार ठोकल्यास तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनेल. या बाबतीत तो सेहवागला मागे टाकेल, ज्याने 91 षटकार मारले आहेत, रोहित त्याच्या 88 षटकारांसह मागे आहे. आता रोहित चार षटकार मारून नंबर 1 फलंदाज बनेल. जर टीम इंडियाने दोन्ही डाव खेळले तर रोहितसाठी हा महान विक्रम करणे खूप सोपे होऊ शकते. सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये 69 षटकार मारले आहेत. तो रोहितच्या आसपासही नाही.
कोणत्या खेळाडून मारले सर्वाधिख षटकार
131 षटकार - बेन स्टोक्स (इंग्लंड)*
107 षटकार - ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड)
100 षटकार - ॲडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)
98 षटकार - ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)
97 षटकार - जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
93 षटकार - टिम साऊदी (न्यूझीलंड)*
91 षटकार - वीरेंद्र सेहवाग (भारत)
88 षटकार - रोहित शर्मा (भारत)*
88 षटकार - ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)
87 षटकार - ख्रिस क्रॅन्स (न्यूझीलंड)
87 षटकार - अँजेलो मॅथ्यूज (श्रीलंका)*
हे देखील वाचा: IND vs NZ 1st Test 2024: बंगळुरू कसोटी पराभूत होताच रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, धोनी-गांगुलीच्या क्लबमध्ये झाला सामील
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सिक्सर किंग आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर आहे, ज्याने 131 षटकार ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर असून, त्याने 623 षटकार ठोकले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे, ज्याने 553 षटकार ठोकले आहेत.