IND vs ENG: विराट कोहलीच्या Team India शी संघांनी का घेऊ नये पंगा? इंग्लंडने ऑस्ट्रेलियाकडून घ्यायला पाहिजे धडा

इंग्लंडने मैदानावर रणनीतिक चुका केल्या परंतु यजमानांनी शेवटच्या दोन दिवसांत टीम इंडियाशी चुकीच्या पद्धतीने पंगा घेतल्यामुळे हातातला सामना गमावला असे म्हणता येईल. इंग्लंडने तीच चूक केली जी ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन टेस्टपूर्वी केली. गब्बा येथे जे घडले त्यातून रूटच्या इंग्लिश टीमने धडा घ्यायला हवा होता.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

भारताविरुद्ध (India) लॉर्ड्स कसोटी (Lords Test) सामन्यात विजयाने इंग्लंड (England) पराभवाची मालिका सुरूच राहिली आहे. क्रिकेट तज्ञ आणि इंग्लंडचे माजी खेळाडू एका सामन्यात संघाच्या पराभवाचे विश्लेषण करत आहेत ज्यावर टीम इंडियाने (Team India) बहुतांश वर्चस्व गाजवले. काही काळापासून इंग्लिश कसोटी संघात, विशेषत: त्यांच्या फलंदाजी विभागात बदलांची मागणी केली जात आहे. पण एक मोठा घटक होता जो जवळजवळ प्रत्येकाने लॉर्ड्स कसोटी दरम्यान दुर्लक्ष करण्यात आला. इंग्लंडने मैदानावर रणनीतिक चुका केल्या ज्यामुळे फलंदाज घरच्या परिस्थितीमध्ये फ्लॉप झाले परंतु यजमानांनी शेवटच्या दोन दिवसांत टीम इंडियाशी चुकीच्या पद्धतीने पंगा घेतल्यामुळे देखील हातातला सामना गमावला. (IND vs ENG 2021: लॉर्ड्सवर टीम इंडियाने दाखवला दम, पण ‘या’ 3 कमतरता सुधारल्या नाहीत तर हातून निसटणार मालिका)

जेम्स अँडरसन (James Anderson), जोस बटलर आणि इतर काही खेळाडू विराट कोहलीसह (Virat Kohli) भारतीय फलंदाजांना स्लेजिंग करत राहिले, परंतु जो रूटच्या ब्रिटिश संघावर ही रणनीती उलटली. पाचव्या दिवशी वेगवान गोलंदाज अँडरसन, मार्क वुड आणि ओली रॉबिन्सन यांनी शमीसोबतच्या 9 व्या विकेटच्या भागीदारीच्या वेळी बुमराहशी पंगा घेतला ज्यामुळे दोन्ही संघांमधील तणाव वाढला. केएल राहुल सामन्यानंतर म्हणाला, “जर कोणी आमच्या खेळाडूंपैकी कोणीवर पडला तर बाकीचे 10 लोक सुद्धा खूप खळबळ माजवतील. जर तुम्ही आमच्यापैकी एकाच्या मागे गेलात तर याचा अर्थ तुम्ही संपूर्ण टीमच्या मागे जात आहात.” आणि लॉर्ड्समध्ये नेमके तेच घडले. अशाप्रकारे 272 धावांचा पाठलाग करताना इंग्लंड 120 धावांवर बाद झाला.

दरम्यान, असे म्हणता येईल की इंग्लंडने तीच चूक केली जी ऑस्ट्रेलियाने यंदा ब्रिस्बेन कसोटीपूर्वी केली होती. गब्बा येथे टीम पेनच्या संघासोबत जे घडले त्यातून रूटच्या इंग्लिश टीमने धडा घ्यायला हवा होता. भारताने गब्बाचा किल्ला सर केला आणि ऑस्ट्रेलियाला चकित करून 32 वर्षांत ब्रिस्बेनमध्ये जिंकणारा पहिला संघ बनला. मालिका पराभवानंतर 2020-21 बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाने केलेल्या सर्वात मोठ्या चुकांपैकी भारताला स्लेजिंग करणे ही सर्वात मोठी चूक असल्याचे पेनने मान्य केले.

अशाप्रकारे आतापर्यंत सर्व संघांना हे माहीत असायला हवे की हा भारतीय संघ भूतकाळासारखा नाही आणि विरोधी पक्षाने प्रतिज्ञा केल्यावर ते पलटवार करतात. गब्बा येथे रिषभ पंत विजयाचा नायक ठरला तर लॉर्ड्समध्ये शमी, बुमराह, ईशांत शर्मा आणि सिराज यांनी इंग्लंडला चकित केले वे ‘क्रिकेटच्या पंढरी’त तिसरा विजय मिळवला. शिवाय चाहते देखील परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये संघाचा 12 वा खेळाडू उत्साह वाढवते ज्याचा संघाला फायदा होतो.