IPL Auction 2025 Live

IND vs ENG Test Series 2021: अहमदाबादच्या निर्णायक चौथ्या टेस्ट सामन्यापूर्वी ‘या’ 3 विभागात करावी लागणार सुधार, वाचा सविस्तर

शेवटी पाच दिवसाचा कसोटी सामना दोन दिवसांच्या अखेरीस संपुष्टात आला, जे कोणत्याही संघाच्या फलंदाजांसाठी कधीच चांगले लक्षण नाही.

विराट कोहली, ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत 1st टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG Test Series 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने (India) इंग्लंडला (England) 10 गडी राखून पराभूत केले, पण कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. शेवटी पाच दिवसाचा कसोटी सामना दोन दिवसांच्या अखेरीस संपुष्टात आला, जे कोणत्याही संघाच्या फलंदाजांसाठी कधीच चांगले लक्षण नाही. अनेक भारतीय फलंदाज कसोटीत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले, तर वेगवान गोलंदाजांना करण्यासाठी जास्त काहीच नव्हते. त्यामुळे, आता 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या सामन्यात तरी काही चांगला खेळ पाहायला मिळेल अशी नक्कीच चाहत्यांना वाटत असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चौथा सामना देखील खेळवण्यात येणार असून या सामन्यापूर्वी टीम इंडियाला (Team India) संघातील तीन विभागात सुधार करण्याची गरज आहे ज्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबादमध्ये Axar Patel याला इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी, हरभजन सिंहचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड असेल निशाण्यावर)

1. इंग्लंडचा एकटा फ्रंटलाइन स्पिनर भारतावर भारी पडला

पहिला दिवस नंतर असे वाटत होते की इंग्लंडने चुकीचा प्लेइंग इलेव्हन निवडला. केवळ जॅक लीचला फ्रंटलाइन स्पिनर म्हणून खेळवले. शिवाय, इंग्लिश टीमच्या पहिल्या डावातील धावांच्या प्रत्युत्तरात संघ पहिल्या दिवसाखेर 13 धावांनी पिछाडीवर होते. दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रामध्ये जे काही घडले कमी धक्कादायक नव्हते. लीचने रोहित आणि अजिंक्य रहाणेला परत पाठविल्यानंतर रूटने सूत्रे हाती घेतली व भारतीय फलंदाजांवर हल्ला चढवला. रूटने फक्त 8 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतल्या व यजमान संघाला 145 धावांवर गुंडाळलं. दुसरीकडे, इंग्लिश टीमने सामना गमावला असला तरी यजमान केवळ लीच आणि रूटने त्यांना कसे अडचणीत टाकले याचा नक्की विचार करतील.

2. कर्णधार विराट कोहली मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी

विराट कोहलीने 459 दिवसांपूर्वी आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले होते. भारतीय कर्णधार अजिबात खराब फॉर्मात नाही आणि क्रीजवर असताना तो स्वतःच्या लीगमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण निष्काळजी शॉटने कोहलीला शतकी धावसंख्येपासून दूर ठेवले आहे. कोहली आता आंतरराष्ट्रीय 70 शतकांवर अडकला असून तो त्याचे ट्रेडमार्क शतक करण्यात का अपयशी होत आहे याबद्दल चाहते आणि तज्ञ देखील विचारात पडले आहे.

3. अजिंक्य रहाणेचा घरेलू फॉर्म

अजिंक्य रहाणेचे संघासाठी असलेले मूल्य हे आकड्यांद्वारे अचूकपणे दर्शविले जाऊ शकत नाही. संघ अडचणीत असताना जादुई डाव खेळण्याची त्याची क्षमता आहे. पण रहाणे यांची गेल्या काही वर्षातील आकडेवारीचांगली राहिली नाही. आणि घरच्या मैदानावर भारतीय कसोटीचा उपकर्णधाराने केवळ 36.69 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याने ही मालिका खेळली असून रहाणेने 17 च्या सरासरीने केवळ 85 धावा केल्या आणि यापैकी 67 धावा त्याने एकाच डावात केल्या आहेत. संघातील त्याच्या 5व्या स्थानाला कोणताही धोका नाही, परंतु भारताचा उपकर्णधार म्हणून निश्चितच चिंतेत भर घालणारे आहे.

आता चौथ्या सामन्यापूर्वी संघाला या विषयां संबंधित नक्कीच विचार करण्याची आणि त्याचा तोडगा काढण्याची गरज आहे कारण या कमजोरी यजमान संघाला कदाचित भारी पडू शकतात ज्याचा फायदा इंग्लिश संघाला मिळू शकतो.



संबंधित बातम्या