Rohit Sharma आणि पत्नी Ritika Sajdeh चेन्नई हॉटेलमध्ये क्वारंटाइन, हिटमॅनने शेअर केला Quaran-Team फोटो, पहा
रोहितने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक स्टोरी अपलोड केली असून त्यात तो आणि रितिका कॅमेर्याकडे पाहत हसताना दिसत आहे. "क्वारंटीम" असं कॅप्शन देत रोहितने फोटो अपलोड केला.
IND vs ENG Series 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात 5 फेब्रुवारीपासून चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. टीम इंडियाचे (Team India) सर्व खेळाडू 27 जानेवारीला चेन्नईला (Chennai) पोहोचले असून आता ते एक आठवडा क्वारंटाइन राहतील. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, ओपनर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पहिलेच चेन्नईला रवाना झाले होते. या दरम्यान, टीम इंडियाचा क्रिकेटर रोहितने इन्स्टाग्रामवर पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) हिच्यासह चेन्नईतील क्वारंटाइन फोटो शेअर केला. रोहितने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक स्टोरी अपलोड केली असून त्यात तो आणि रितिका कॅमेर्याकडे पाहत हसताना दिसत आहे. "क्वारंटीम" असं कॅप्शन देत रोहितने फोटो अपलोड केला. 33 वर्षीय रोहित पत्नी रितिका आणि मुलगी समायरासह इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. (Ajinkya Rahane Dances with Daughter: अजिक्य रहाणेची क्वारंटाइन धमाल! चेन्नईच्या हॉटेलमध्ये मुलगी आर्या सोबतचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ एकदा पहाच)
रोहितने इंस्टाग्राम आपापल्या स्टोरीमध्ये रितिकासोबत एक फोटो शेअर केला आहे ज्यात दोघेही हॉटेलच्या बाल्कनीत एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. दरम्यान, नुकत्याच संपुष्टात आलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20 आणि वनडे मालिकेला मुकलेला रोहित कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यातून मैदानावर परतला. सिडनी क्रिकेट ग्राउंड (एससीजी) आणि ब्रिस्बेनमधील द गाब्बा येथे अंतिम दोन कसोटी सामन्यांमध्ये रोहित खेळला. रोहितने दोन खेळांमध्ये 32.25 च्या सरासरीने 129 धावा केल्या. रोहित आपल्या चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अयशस्वी ठरला ज्याच्यामुळे त्याच्यावर दिग्गज खेळाडूंनीही टीका केली.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौर्याच्या अंतिम तीन कसोटी सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे नियमित कर्णधार विराट कोहलीच्या पुनरागमनानंतर इंग्लंडविरुद्ध उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पितृत्व रजा मंजूर केल्यामुळे अॅडिलेडमधील पहिल्या कसोटीच्या समाप्तीनंतर कोहली मायदेशी परतला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळणारा अष्टपैलू हार्दिक पांड्याचा इंग्लंडविरुद्ध पहिल्या दोन टेस्ट मॅचसाठी भारतीय संघात सामील करण्यात आले आहेत. वेगवान गोलंदाज इशांत शर्माही मैदानावर परतणार आहे.