IND vs ENG Test 2021: टीम इंडियापुढे इंग्लंडचे कडवे आव्हान; जो रूट, जेम्स अँडरसन यांना रोखण्याचे मोठे चॅलेंज, वाचा सविस्तर

चेन्नईमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत अशा स्थितीत जो रुटच्या इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.

विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG Test 2021: इंग्लंड (England) संघाचे खेळाडू चेन्नई शहरात दाखल झाले आहेत. सध्या संघाचा मूड उत्साहपूर्ण आहे आणि त्यामागे कारणे अनेक आहेत. त्यापैकी एक निश्चितपणे म्हणजे श्रीलंकाविरुद्ध (Sri Lanka) व्हाईटवॉश आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा त्यांच्याच देशात पुन्हा पराभव केल्यानंतर टीम इंडिया (Team India) आता घरच्या मैदानावर इंग्लिश टीमवर वर्चस्व गाजवण्यास सज्ज आहे. दोन्ही संघाचे मनोबल सध्या उंचावले आहेत ज्यामुळे आगामी मालिका नक्कीच मनोरंजक ठरणार असेल. इंग्लंडने गेल्या तीन दशकांत फक्त एकदाच भारतामध्ये कसोटी मालिका जिंकली आहे पण इंग्लंड संघ सध्या अधिक चांगल्या तयारीने व सुसज्ज दिसत आहेत. चेन्नईमध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक आहेत अशा स्थितीत जो रुटच्या इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाला (Indian Team) कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. (IND vs ENG Test Series 2021: आर अश्विन याचं चेतेश्वर पुजाराला खुलं चॅलेंज, म्हणाला-'इंग्लंडविरुद्ध मालिकेत असे केल्यास माझी अर्धी मिशी उडवून टाकेन')

जो रूटचा डबल दणका

रूट एक अप्रतिम फलंदाज आहे यात काही शंका नाही आणि श्रीलंकाविरुद्ध संपुष्टात आलेल्या मालिकेत त्याने हे सिद्धही केले. रूटने पुढाकार घेत संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्या सामन्यात 228 धावा करत 13 महिन्यानंतर शतकी खेळी केली. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात 186 धावांच्या डावाने त्याच्या आगमनाची पुष्टी झाली. दुसऱ्या डावात केलेली शतकी खेळी महत्वपूर्ण ठरली कारण संघ दबावात असताना ती केली गेली. श्रीलंकेच्या 381 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने 340 धावांपर्यंत मजल मारली.

जेम्स अँडरसनचा वेगवान हल्ला

38 वर्षीय अँडरसन बर्‍याच संघ-खेळाडूंपेक्षा अधिक फिट आहे जे आगामी मालिकेत आपली चमक दाखवण्यासाठी उत्सुक आहेत. अँडरसनने शेवटच्या 2 कसोटी सामन्यात 5 व अधिक विकेट घेतल्या आहेत. शिवाय, 600 पेक्षा अधिक विकेट घेणारा एकमेव वेगवान गोलंदाज म्हणूनही त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान आशियामध्ये कपिल देवच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या गोलंदाजीची सरासरी चांगली होती. त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (आयसीसी रँकिंगमध्ये 2 वे स्थान), जोफ्रा आर्चर आणि क्रिस वोक्सवर त्याच्या उपस्थितीत आणखी दबाव असेल.

बेन स्टोक्स-जोफ्रा आर्चरचे कमबॅक

श्रीलंका दौर्‍यासाठी विश्रांती घेतल्यानंतर खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपाचा पहिला क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू स्टोक्स कसोटी संघात परतला आहे. भारतीय परिस्थिती चांगली जाणणारा वेगवान गोलंदाज आर्चरही उर्वरित कालावधीनंतर कमबॅक करत आहे. दोघांच्या आगमनाने इंग्लंड संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल. दोन्ही क्रिकेटपटू गोलंदाजी व फलंदाजी विभागात डेप्थ प्रदान करतात.

फिरकी विभाग

श्रीलंकाविरुद्ध 2 सामन्यांमधून जॅक लीचने 10 विकेट घेत चमकदार कामगिरी बजावली. भारत दौऱ्याला अधिक अविस्मरणीय बनवण्यासाठी तो आणखी उठावदार कामगिरी करण्याच्या प्रतीक्षेत असेल. त्याला मोईन अलीची साथ मिळेल जो श्रीलंका दौऱ्यावर कोविड-19 मुळे दोन्ही कसोटी सामन्यांना मुकला होता. 33 वर्षीय मोईनने 60 सामन्यात 181 विकेट घेतल्या असून 41 विकेट त्याने भारताविरुद्ध घेतल्या आहेत.

दरम्यान, इंग्लंडचा मुख्य गट हा जागतिक दर्जाचा आहे आणि रिषभ पंत, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियामध्ये जे केले ते करण्यासाठी त्यांच्याकडे झॅक क्रॉली, डोम बेस आणि डॅन लॉरेन्स यांच्यासारखे युवा खेळाडू आहेत.