IND vs ENG ODI Series 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार इंग्लंडविरुद्ध तिसरा वनडे सामना, MCA ने सांगितले हे कारण

इंग्लंडविरुद्ध 28 मार्च रोजी होणाऱ्या तिसरा वनडे सामना पुणे ते मुंबई येथे स्थानांतरित करण्यासाठी बीसीसीआयशी चर्चा सुरु असल्याचं MCA ने गुरुवारी सांगितले. मार्चमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यास एमसीए सज्ज असल्याची माहिती अध्यक्ष विकास काकतकर यांनी दिली. सध्याच्या वेळापत्रकानुसार, 23 मार्च, 26 मार्च, 28 मार्च गहुंजे येथील स्टेडियमवर एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.

भारत-इंग्लंड (Photo Credit: Getty)

IND vs ENG ODI Series 2021: इंग्लंडविरुद्ध (England) 28 मार्च रोजी होणाऱ्या तिसरा वनडे सामना पुणे ते मुंबई (Mumbai) येथे स्थानांतरित करण्यासाठी बीसीसीआयशी चर्चा सुरु असल्याचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) गुरुवारी सांगितले. “अशी चर्चा देखील झाली आहे की, एक सामना (28 रोजी) मुंबई येथे हलविला जाऊ शकतो, जेणेकरून मुंबईहून ब्रिटनला (UK) जाणाऱ्या संघांना सुलभ व्हावे, परंतु या संदर्भातील अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे," क्रिकेट संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, मार्चमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यास एमसीए (MCA) सज्ज असल्याची माहिती अध्यक्ष विकास काकतकर यांनी दिली. सध्याच्या वेळापत्रकानुसार, 23 मार्च (मंगळवार), 26 मार्च (शुक्रवार) आणि 28 मार्च (रविवारी) गहुंजे येथील स्टेडियमवर एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. (IND vs ENG Test Series 2021: भारताविरुद्ध चौथ्या टेस्ट सामन्यातून इंग्लंड अष्टपैलू Sam Curran आऊट; टी-20, वनडे मालिकेची करणार तयारी)

“सलग तीन मॅचचे नियोजित असल्याने स्टेडियमवर 3 मुख्य विकेट्सचा प्रयोग ताज्या विकेटवर खेळण्याचा उत्कृष्ट उपयोग होईल,” असे या निवेदनात म्हटले आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबतही अंतिम निर्णय पुढील तारखेला घेण्यात येईल, असेही यात नमूद केले आहे. एमसीएने म्हटले आहे की सामन्यांची तयारी करताना कोणतीही कसर सोडली जाणार नाही. "दरम्यान, असोसिएशन विकेट, प्रेक्षकांची व्यवस्था, तसेच राज्य सरकार स्टेडियम क्षमतेच्या वापरासंदर्भात जारी केलेल्या सर्व अंतिम घोषणा बनवून व त्यांचे पालन करण्याच्या दृष्टीने कसलीही कसर सोडत नाही. अन्य सुरक्षा आणि सुरक्षितता उपाय," प्रसिद्धीप्रत्रकात पुढे म्हटले आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश आणि बीसीसीआय एसीयूच्या अधिकाऱ्यांनीही स्टेडियमची पाहणी .केली.

इंग्लंडविरुद्ध ठरलेल्या वेळापत्रकानुसार, पाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांची मालिका अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर 12, 14, 16, 18 आणि 20 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. यानतर, 3 एकदिवसीय सामने 23, 26 आणि 28 मार्च रोजी पुण्याच्या, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. दुसरीकडे, दोन्ही संघात सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. इंग्लंडने सलामीचा सामना जिंकत मालिकेची विजयी सुरुवात केली, तर यजमान टीम इंडियाने 317 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता मालिकेचे उर्वरित दोन्ही सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळले जाणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now