IND vs ENG 4th Test 2021: भारत आणि इंग्लंड संघात अहमदाबाद येथे होणार काट्याची टक्कर, अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग XI

इंग्लिश टीम विजयाच्या शोधात असेल ज्यामुळे ते बरोबरी करत मालिका अनिर्णीत करतील. अशास्थितीत, दोन्ही संघाना चौथ्या कसोटी सामन्यासाठी जबरदस्त प्लेइंग निवडण्याची गरज आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: चेन्नईच्या पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी विजय मिळवत इंग्लंडने (England) भारताविरुद्ध (India) मालिकेची दमदार सुरुवात केली पण, दुसरा आणि तिसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) रोहित शर्मा आणि आर अश्विनचे शतक आणि अक्षर पटेलच्या फिरकीच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवला. यासह चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेत भारतीय संघ (Indian Team) सध्या 2-1ने आघाडीवर असून अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या आणि निर्णायक सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने संघ मैदानात उतरेल तर इंग्लिश टीम विजयाच्या शोधात असेल ज्यामुळे ते बरोबरी करत मालिका अनिर्णीत करतील. अशास्थितीत, दोन्ही संघाना चौथ्या कसोटी सामन्यासाठी जबरदस्त प्लेइंग निवडण्याची गरज आहे. (IND vs ENG 4th Test 2021: विराट कोहली करणार MS Dhoni याच्या खास रेकॉर्डची बरोबरी, अहमदाबाद टेस्टसाठी मैदानावर उतरताच नावावर करणार खास विक्रम)

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या काट्याच्या लढाईत भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी सलामीला येईल. रोहितने मालिकेत सध्या सर्वाधिक धावा केल्या आहेत तर शुभमनला अद्याप खास कामगिरी करण्याची संधी मिळाली नसली तरी तो त्याच्या मागील फॉर्मच्या जोरावर आपली जागा कायम ठेवेल. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांच्यावर मधल्या फळीत धावांचा वेग वाढवण्याची जबाबदार असेल. आर अश्विन आणि अक्षर पटेल फिरकी गोलंदाजीसह बॅटने योगदान देऊ इच्छित असतील. गोलंदाजी विभागात काही बदल होऊ शकतात. जसप्रीत बुमराहने माघार घेतल्याने मोहम्मद सिराज किंवा उमेश यादवला संधी मिळू शकते. तर वॉशिंग्टन सुंदर मागील सामन्यात काही खास करू न शकल्याने त्याच्या जागी कुलदीप यादवचा अतिरिक्त फिरकीपटू म्हणून समावेश केला जाऊ शकतो.

दुसरीकडे, इंग्लिश टीम डोम सिब्ली आणि झॅक क्रॉलीच्या सलामी जोडीला रिटेन करतील. जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स आणि ओली पोपवर मधल्या फळीत धावांची जबाबदार असेल. बेन फोक्स संघाचा विकेटकीपर असेल. इंग्लंड संघ देखील आपल्या गोलंदाजीत काही बदल करू शकतात. स्टुअर्ट ब्रॉडला बाहेर करत डोम बेसचा समावेश होऊ शकतो तर जोफ्रा आर्चर, जॅक लीच आणि जेम्स अँडरसनचे संघातील स्थान कायम राहील.

पहा भारत-इंग्लंडचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज/उमेश यादव.

इंग्लंड: जो रूट (कॅप्टन), डोम सिब्ली, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जॅक लीच, डोम बेस आणि जेम्स अँडरसन.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप