IND vs ENG 4th Test: जसप्रीत बुमराहची विक्रमी कामगिरी, कपिल देव यांना मागे टाकत नंबर 1 च्या सिंहासनावर झाला विराजमान

इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या ओली पोपला फक्त दोन धावांवर बाद करता त्याने अवघ्या 24 कसोटींमध्ये ही कामगिरी केली. बुमराहने 24 व्या कसोटी सामन्यात हा आकडा गाठत कपिल देवला (25 कसोटी) मागे टाकले.

जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test: जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सर्वात वेगवान 100 टेस्ट विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध (England) ओव्हल मैदानात (The Oval) सुरु असलेल्या दुसऱ्या डावात त्याने इंग्लंडच्या ओली पोपला (Ollie Pope) फक्त दोन धावांवर बाद करता त्याने अवघ्या 24 कसोटींमध्ये ही कामगिरी केली. बुमराहने 24 व्या कसोटी सामन्यात हा आकडा गाठत 25 कसोटी सामन्यात हा टप्पा सर करणाऱ्या कपिल देवला (Kapil Dev) मागे टाकले आणि सर्वात जलद 100 कसोटी विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनला. एकूणच, बुमराहने भारतीयांमध्ये रवींद्र जडेजाची आठव्या स्थानावर बरोबरी केली आहे. रविचंद्रन अश्विन हा कारनामा कारनामा करणारा सर्वात वेगवान आहे ज्याने त्याच्या 18 व्या सामन्यात 100 वी कसोटी विकेट घेतली आहे. दरम्यान, बुमराहची सध्या गोलंदाजीची सरासरी 22.45 आहे, जी पहिल्या 100 कसोटी विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे. बुमराहनंतर दुसरा सर्वोत्तम अश्विन आहे, ज्याची सरासरी 24.56 होती जेव्हा त्याने आपली 100 वी कसोटी विकेट घेतली. (Jasprit Bumrah Yorker Video: बुमराहचा खतरनाक यॉर्कर! ओव्हल टेस्टमध्ये भारतीय गोलंदाजाने ‘या’ अप्रतिम चेंडूवर Jonny Bairstow याची दांडी गुल)

जसप्रीत बुमराह आणि कपिल देव यांना वगळता वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने 28 कसोटींमध्ये, मोहम्मद शमी 29 आणि जवागल श्रीनाथने 30 कसोटींमध्ये हा मोठा पराक्रम केला आहे. मात्र, सध्याच्या मालिकेत अश्विनला अद्याप संधी मिळालेली नाही. त्याने कसोटीत 400 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, शमी देखील कसोटी सामन्यातून बाहेर बसला आहे. 27 वर्षीय बुमराहने जानेवारी 2018 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. म्हणजेच तब्बल साडेतीन वर्षात त्यांनी 100 विकेट्सचा आकडा गाठला आहे. तसेच बुमराहच्या कसोटी कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 24 कसोटींच्या 46 डावांमध्ये 23 च्या सरासरीने आतापर्यंत 101 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दुसऱ्या डावात जॉनी बेअरस्टोलाही बोल्ड केले. त्याने 6 वेळा 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. पण त्याला आतापर्यंत एका सामन्यात 10 बळी घेण्याचा पराक्रम करता आलेला नाही. याशिवाय त्याने 67 वनडे सामन्यांमध्ये 108 आणि 50 टी-20 मध्ये 59 विकेट्स घेतल्या आहेत.

दुसरीकडे, टीम इंडियाने पहिल्या डावात 191 धावा आणि दुसऱ्या डावात 466 धावा केल्या. इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा केल्या. पाच सामन्यांची मालिका सध्या एक-एक बरोबरीत आहे.