IND vs ENG 4th Test Day 3 Live Streaming: भारत-इंग्लंड संघातील चौथी अहमदाबाद टेस्ट कुठे, कधी आणि कसे पाहणार? जाणून घ्या LIVE Streaming व TV Telecast बाबत सर्वकाही
आता तिसऱ्या दिवशी आघाडी वाढवण्याचा उर्वरित भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारत आणि इंग्लंड संघातील तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात. तर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असणार आहे.
IND vs ENG 4th Test Day 3: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात चौथ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होणार आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करत जो रूटची इंग्लिश टीमची वरचढ होत असताना रिषभ पंत (Rishabh Pant) आणि वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) शतकी भागीदारीने संघाला दुसऱ्या दिवसाखेर मोठी आघाडी मिळवून दिली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा पंत 118 चेंडूत 101 धावा करून बाद झाला होता तर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध 89 धावांची आघाडी घेतली होती. आता तिसऱ्या दिवशी आघाडी वाढवण्याचा उर्वरित भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारत आणि इंग्लंड संघातील तिसऱ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात. तर सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असणार आहे. (IND vs ENG 4th Test 2021: Rishabh Pant याने ठोकले खणखणीत शतक, ड्रेसिंग रूममधून धावून येत Virat Kohli ने दिली सर्वांचं मन जिंकणारी रिअक्शन)
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने 7 विकेट गमावून 294 धावा केल्या होत्या. पंत आणि सुंदरची सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी संघासाठी महत्वपूर्ण सिद्ध झाली. पंतने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तिसऱ्या सत्रात धावांचा वेग वाढवत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूने सुंदरनेत्याला मजबूत साथ दिली. आता तिसऱ्या दिवशी सुंदर आणि पटेल 7 बाद 294 धावांपासून संघाची धावसंख्या पुढे नेत यजमान संघाला मोठी आघाडी मिळवण्यासाठी मैदानात उतरतील. पंत आणि सुंदरला वगळता आघाडीच्या फळीत रोहित शर्माने 49 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने आतापर्यंत 3 भारतीय फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.
पहा भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड: जो रूट (कॅप्टन), डोम सिब्ली, झॅक क्रॉली, डॅन लॉरेन्स, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), जॅक लीच, डोमिनिक बेस आणि जेम्स अँडरसन.