IND vs ENG 4th Test Day 3: क्यू हिला डाला ना! Ashwin याचे अहमदाबाद टेस्टच्या दुसऱ्या डावात सलग 2 चेंडूत इंग्लंडला डबल दणका, पहा व्हिडिओ

डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये अश्विनने दोन चेंडूंत दोन विकेट घेतल्या आणि पाहुण्या संघाला बॅकफूटवर ढकलले.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 3: अहमदाबाद (Ahmedabad) येथे चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने (England) पहिल्या डावात केलेल्या 205 धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 365 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर, दुसऱ्या डावात फलंदाजीला मैदानात उतरलेल्या इंग्लिश संघाला यजमान संघाचा ज्येष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) सुरुवातीलाच लागोपाठ दोन मोठे धक्के दिले. डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये अश्विनने दोन चेंडूंत दोन विकेट घेतल्या आणि पाहुण्या संघाला बॅकफूटवर ढकलले. त्याने सलामीवीर झॅक क्रॉली (Zak Crawley) आणि नंबर 3 फलंदाज जॉनी बेयरस्टोला (Jonny Bairstow) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यामुळे, दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने अवघ्या 10 धावांवर 2 विकेट गमावल्या. क्रॉली 5 तर अश्विनने बेअरस्टोला पहिल्याच चेंडूवर शून्यावर स्लिपमध्ये रोहित शर्मा याच्याकडे झेलबाद केले. अश्विनने पाचव्या ओव्हरच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर ही कमाल केली. (IND vs ENG 4th Test Day 3: टीम इंडियाला मोठा धक्का बसला, इंग्लंड फलंदाजाच्या जोरदार शॉटवर Mohammed Siraj दुखापतग्रस्त होऊन मैदानाबाहेर पडला)

इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि डॉम सिब्लीची जोडी सलामीला उतरली होती. त्यांनी संयमी सुरुवात केली होती. मात्र, 5व्या षटकात आर अश्विनने क्रॉलीला चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेअरस्टोला देखील त्याने बाद केले, ज्यामुळे इंग्लंडला लागोपाठ 2 धक्के बसले. तत्पूर्वी, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 96 धावांची खेळी करून नाबाद परतला तर टीम इंडियाने पहिल्या डावात 365 धावांपर्यंत मजल मारली मात्र, सुंदरचे शतक थोडक्यात हुकले. भारताकडून सर्वाधिक रिषभ पंतने 101 धावांची खेळी केली. तसेच रोहित शर्माने 49 आणि अक्षर पटेलने43 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर जेम्स अँडरसनने 3 आणि जॅक लीचने 2 भारतीय फलंदाजांना बॅड केले. अक्षर आणि सुंदरने आठव्या विकेटसाठी 106 धावांची भागीदारी केली आणि लंचपूर्वी आणखी 71 धावा केल्या.

झॅक क्रॉली

जॉनी बेयरस्टो

दरम्यान, अश्विनने कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेण्याच्या दृष्टीने वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज कर्टली एम्ब्रोस यांना मागे टाकले. इंग्लंडच्या बेअरस्टोला बाद अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक पल्ला गाठला. वेस्ट इंडीज संघासाठी कर्टली एम्ब्रोसने कसोटी क्रिकेटमध्ये 405 विकेट घेतल्या असून अश्विनने आता 406 कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. शिवाय, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम आणि भारतीय महान फिरकी गोलंदाज हरभजन सिंह यांच्या कसोटी विकेट पासूनही अश्विन काही पावलं दूर आहे. अकरमने 414 टेस्ट विकेट्स तर भज्जीने 417 कसोटी गडी बाद केले आहेत.



संबंधित बातम्या

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद

NZ Beat ENG 3rd Test 2024 Scorecard: तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 423 धावांनी केला पराभव, मिशेल सँटनर ठरला विजयाचा हिरो; टीम साऊदीला मिळाल शानदार निरोप