IND vs ENG 4th T20I 2021: जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर Suryakumar Yadav ने खेचला खणखणीत सिक्स, आंतरराष्ट्रीय करिअरची केली दणक्यात सुरुवात (Watch Video)

सूर्यकुमार यादवला ईशान किशनच्या जागी संधी देण्यात आली आहे. सूर्यासाठी हा सामना खूप खास ठरला आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दणक्यात आपले आगमन जाहीर केले. यादवने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर क्लासी सिक्सर खेचला.

आर्चरच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवचा सिक्स (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 4th T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या भारतविरुद्ध (India) चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने (England) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात डेब्यू सामन्यात फलंदाजीची संधी न मिळालेल्या आणि पुढच्या सामन्यातून बाहेर पडलेल्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) ईशान किशनच्या जागी संधी देण्यात आली आहे. सूर्यासाठी हा सामना खूप खास ठरला आणि त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दणक्यात आपले आगमन जाहीर केले. संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा बाद झाल्यावर यादव तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरला. भारतीय डावातील तिसऱ्या ओव्हरचा पाचवा चेंडू सूर्यकुमारच्या आंतरराष्ट्रीय स्टेजवरील पहिला चेंडू होता आणि तो इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) टाकत होता. यादवने सामन्यातील चौथ्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर क्लासी सिक्सर खेचला. (IND vs ENG 4th T20I 2021: Rohit Sharma याची धमाल, Virat Kohli याच्यानंतर टी-20 क्रिकेटच्या ‘या’ एलिट यादीत सामील होणारा ठरला दुसराच भारतीय)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघात सूर्यकुमारची संघात निवड करण्याची मागणी केली जात होती. आणि आता आर्चरच्या चेंडूवर यादवने खणखणीत षटकार खेचत आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दणक्यात सुरुवात केली. इतकंच नाही तर यश त्याने आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माची बरोबरी केली. टी-20 सामन्याच्या आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा स्काय दुसरा भारतीय ठरला आहे. सूर्यापूर्वी रोहित शर्मानेही हा पराक्रम केला असून आंतरराष्ट्रीय स्तरावर यादव हा पराक्रम करणारा 8वा फलंदाज आहे. दरम्यान, इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने पदार्पण केले. मात्र, त्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर, तिसर्‍या टी-20 सामन्यात रोहितचे टीम इंडियामध्ये पुनरागमन झाल्यानंतर सूर्यकुमारला बाहेर केले गेले होते.

शिवाय, आंतरराष्ट्रीय टी-20 करिअरच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचणारा यादव पहिला भारतीय फलंदाज आहे. 2007 मध्ये जोहान्सबर्ग येथे भारताविरुद्ध पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने अशी कामगिरी केली होती. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेच्या मंगलीसो मोशेलेने 2017 मध्ये सेंचुरियन येथे श्रीलंकेविरुद्ध या कामगिरीची पुनरावृत्ती केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif