IND vs ENG 4th T20I 2021: इंग्लंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; KL भारतीय संघात कायम, पहा कोण IN आणि कोण OUT
5 सामान्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लिश संघ सध्या 2-1 अशा फरकाने आघाडीवर असून त्यांचा आजचा सामना जिंकून मालिका खिशात घराण्याची सुवर्ण संधी आहे.
IND vs ENG 4th T20I 2021: भारताविरुद्ध (India) अहमदाबादच्या (Ahmedabad) मोटेरा स्टेडियमवरील चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पुन्हा एकदा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 सामान्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लिश संघ सध्या 2-1 अशा फरकाने आघाडीवर असून त्यांचा आजचा सामना जिंकून मालिका खिशात घराण्याची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे, इंग्लंडचा विजयीरथ रोखून मालिकेत बरोबरी करण्याच्या उद्देशाने टीम इंडिया आज मैदानावर उतरणार आहे. आजच्या सामन्यासाठी यजमान संघाने मागील सामन्यातील आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. टीम इंडियाने मागील दोन सामने पहिले फलंदाजी करून गमावले आहे त्यामुळे, आजच्या सामन्यात कोण बाजी मारेल याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे. (IND vs ENG 4th T20I 2021: 'करो या मरो'च्या सामन्यापूर्वी टीम इंडियात गहन चर्चा, BCCI ने ट्विट करुन लिहिले...)
आजच्या साम्यासाठी टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनयामध्ये दोन बदल केले आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि राहुल चाहर (Rahul Chahar) यांचा यजमाना संघात समावेश झाला असून युजवेंद्र चहल आणि ईशान किशन यांना बाहेर करण्यात आले आहे. किशनला दुखापतीमुळे सामन्याला मुकावे लागत आहे. शिवाय, मागील तीन सामन्यात सलामीला येत अपयशी ठरत असलेल्या केएल राहुलचे सलामी फलंदाज म्हणून स्थान कायम असून तो उपकर्णधार रोहित शर्मासह ओपनिंगला येईल तर सूर्यकुमार तिसऱ्या स्थानावर उतरेल. दुसरीकडे, इंग्लंडने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही. जेसन रॉय आणि जोस बटलरची सलामी जोडी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करत दोघांनी यापूर्वी संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. जॉनी बेअरस्टो तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येईल. विशेष म्हणजे आजचा सामना बेअरस्टोच्या टी-20 आंतर्राष्ट्रीय कारकिर्दीतील 50वा सामना आहे. शिवाय, गोलंदाजीत मार्क वूड प्रभावी कामगिरी बजावत असून त्याच्याकडून निर्णायक सामन्यात देखील संघाला मोठ्या अपेक्षा असतील. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांच्यावर वूडला साथ देण्याची जबाबदारी असेल.
असा आहे भारत-इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर/दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड: इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन राय, जोस बटलर, जॉनी बेयरेस्टो, डेविड मलान, बेन स्टोक्स, सॅम कुरन, क्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.