IND vs ENG 3rd Test: लीड्स कसोटीत इंग्लंड उतरवणार तगड्या खेळाडूंची फौज, पाहा जो रूटच्या ब्रिटिश सेनेचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

लीड्स येथे टीम इंडियाविरुद्ध ब्रिटिश तिसऱ्या सामन्यात बदलांसह उतरणार आहे. डेविड मलान आणि साकीब महमूद यांना संघात स्थान देण्यात आले आहे. भारताविरुद्ध तिसऱ्या तेस्व सामन्यात इंग्लंडचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन यावर आज आपण नजर टाकणार आहोत.

इंग्लंड विरुद्ध भारत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 3rd Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. लीड्स (Leeds) येथे टीम इंडिया (Team India) 1-0 अशी आघाडी घेऊन मैदानात उतरेल. लॉर्ड्सवर खेळलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला. अशास्थितीत मालिकेत पिछाडीवर असलेला यजमान ब्रिटिश संघ पुढील सामन्यात तिसऱ्या सामन्यात बदलांसह उतरणार आहे. सलामीवीर डोम सिब्लीला वगळण्यात आले आहे, तर डेविड मलान (Dawid Malan) आणि साकीब महमूद (Saqib Mahmood) यांना संघात स्थान देण्यात आले आहे. भारताविरुद्ध लीड्स कसोटीपूर्वी (Lords Test) यजमान इंग्लंड संघात बदल अपेक्षित होता आणि तसेच घडले. खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या सलामीवीर सिब्लीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होताना दिसत आहे. (IND vs ENG 3rd Test: असे झाल्यास तिसऱ्या लीड्स कसोटीत R Ashwin चे ​​स्थान जवळपास निश्चित, एका वेगवान गोलंदाजाला मिळणार विश्रांती)

दरम्यान, सिब्लीची हकालपट्टी म्हणजे जवळपास पाच वर्षांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळवणारा सलामीवीर हसीब हमीदला सलामीला येण्याची संधी मिळेल. हमीद बर्न्ससह तिसऱ्या कसोटीची सलामीला येऊ शकतो. लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात खाते उघडल्याशिवाय तो बाद झाला तर दुसऱ्या डावात त्याने 9 धावा केल्या. तसेच टी -20 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या डेविड मलानला लीड्स कसोटीत खेळण्याची संधी मिळू शकते. हमीदला सलामीला पाठवले जाऊ शकते, त्यामुळे मालनला त्याच्या जागी तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला मैदानात उतरवले जाऊ शकते. यानंतर कर्णधार जो रूट फलंदाजीला येईल. मलानने क्रमांक चारवर तीन कसोटी खेळल्या आहेत आणि 12 कसोटी सामने त्याने पाचव्या स्थानावर खेळले आहेत. दरम्यान, मलानची कसोटी कारकीर्द काही विशेष राहिलेली नाही. मलानने 15 कसोटीत 27.84 च्या सरासरीने 724 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि 6 अर्धशतके केली आहेत. मलानने 2018 मध्ये भारताविरुद्ध अखेरचा टेस्ट सामना खेळला होता.

दुसरीकडे, गोलंदाजी विभागात एक बदल होणार आहे. मार्क वूडला दुसऱ्या कसोटी सामन्यात खांद्याला दुखापत झाली ज्यामुळे त्याला लीड्स टेस्ट मॅचसाठी इंग्लिश संघात स्थान मिळाले नाही. अशास्थितीत साकिब महमूदला पदार्पणाची संधी मिळू शकते. जेम्स अँडरसन, सॅम कुरन, ओली रॉबिन्सन आणि साकिब महमूद अशा चार वेगवान गोलंदाजांसोबत टीम मैदानात उतरेल. शिवाय मोईन अली संघात एकमेव फिरकीपटू असेल.

तिसऱ्या लीड्स कसोटीसाठी इंग्लंडचा संभाव्य प्लेइंग XI: जो रूट (कॅप्टन), रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (विकेटकीपर), मोईन अली, सॅम कुरान, ओली रॉबिन्सन, साकिब महमूद आणि जेम्स अँडरसन.