IND vs ENG 3rd Test 2021: अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठा Motera Stadium पाहून स्टुअर्ट ब्रॉड इम्प्रेस, सामन्यापूर्वी दाखवली खास झलक (Watch Video)

सामन्याच्या सुरुवातीला सुरु होण्याला काही दिवस शिल्लक असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने शुक्रवारी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमचा पहिला लूक शेअर केला. ब्रॉड स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीची क्षमता पाहून प्रभावित झाला.

मोटेरा स्टेडियमने स्टुअर्ट ब्रॉड इम्प्रेस (Photo Credit: Twitter, Instagram)

IND vs ENG 3rd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचे उर्वरित दोन सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर (Motera Stadium) खेळले जाणार आहेत. 24 फेब्रुवारी रोजी तिसरा सामना सुरु होणार असून दोन्ही संघ अहमदाबादला दाखल झाले आहेत आणि आज सरावासाठी मैदानात उतरले. यजमान टीम इंडिया (Team India) आणि इंग्लंड संघातील तिसरा सामना हा पिंक-बॉलने दिवस/रात्र खेळला जाणार आहे. सामन्याच्या सुरुवातीला सुरु होण्याला काही दिवस शिल्लक असताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) शुक्रवारी अहमदाबाद (Ahmedabad) येथील मोटेरा स्टेडियमचा पहिला लूक शेअर केला. इंग्लंडसाठी 500 पेक्षा अधिक विकेट घेणारा ब्रॉड स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीची क्षमता पाहून प्रभावित झाला. अहमदाबाद मधील मोटेरा स्टेडियम (आताचे सरदार पटेल स्टेडियम) हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे जिथे प्रेक्षक क्षमता 1,10,000 अशी आहे. (IND vs ENG Test Series 2021: भारताविरुद्ध चौथ्या टेस्ट सामन्यातून इंग्लंड अष्टपैलू Sam Curran आऊट; टी-20, वनडे मालिकेची करणार तयारी)

यापूर्वी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम होते. ऑस्ट्रेलियाच्या या स्टेडियममध्ये 1 लाख प्रेक्षक एकावेळी स्टेडियमवर उपस्थित राहू शकतात. दरम्यान, नूतनीकरणानंतर मोटेरा स्टेडियमवर अद्याप आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात आले नाही. मात्र, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टेडियममध्ये भारत-अमेरिकेच्या संबंधांना चालना देण्यासाठी नमस्ते ट्रम्प मोहिमेमध्ये भाषण केले होते. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमधील कर्टनी वॉल्श यांच्या 519 विकेटचा टप्पा पार करण्यापासून इंग्लंडचा ब्रॉड अवघ्या दोन विकेट दूर आहे. आगामी कसोटी सामन्यात बरेच खेळाडूं वैयक्तिक टप्पा गाठण्याच्या प्रतीक्षेत आहे. कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक विकेट घेण्यापासून ब्रॉडचा साथीदार जेम्स अँडरसन अनिल कुंबळेच्या फक्त 8 विकेट मागे आहे.

दुसरीकडे, टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू आणि यजमान संघाच्या दुसऱ्या चेन्नई टेस्ट सामन्याचा नायक रविचंद्रन अश्विनला कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेटचा मैलाचा दगड गाठण्यासाठी 6 विकेटची गरज आहे. तिसरा कसोटी आणि चौथा कसोटी सामना सरदार पटेल स्टेडियमवर खेळला जाणार असून चार कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. न्यूझीलंड संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात टक्कर देण्यासाठी यजमान संघाला उर्वरित सामने जिंकणे गरजेचे आहे.