IND vs ENG 3rd D/N Test: अक्षर-अश्विनच्या फिरकीपुढे इंग्लंडची घसरगुंडी, टीम इंडियाला पिंकबॉल टेस्टमध्ये विजयासाठी 49 धावांचे लक्ष्य

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनच्या फिरकी जोडीने दबदबा कायम ठेवला आणि इंग्लिश टीमला दुसऱ्या डावात 81 धावांवर गुंडाळलं. यासह यजमान टीम इंडियाला विजयासाठी 49 धावांच लक्ष्य मिळालं आहे.

रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 3rd D/N Test: भारताविरुद्ध (India) इंग्लडची (England) निराशाजनक कामगिरी सुरूच राहिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात अक्षर पटेल (Axar Patel) आणि रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) फिरकी जोडीने दबदबा कायम ठेवला आणि इंग्लिश टीमला दुसऱ्या डावात 81 धावांवर गुंडाळलं. यासह यजमान टीम इंडियाला विजयासाठी 49 धावांच लक्ष्य मिळालं आहे. इंग्लंडविरुद्ध पटेलने सलग तिसऱ्यांदा पाच विकेट घेतल्या तर अश्विनने 4 आणि वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली. इंग्लंडसाठी दुसऱ्या डावात बेन स्टोक्सने (Ben Stokes) 25 तर कर्णधार जो रूटने 19 धावा आणि ओली पोपने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय, अन्य इंग्लिश फलंदाज दाहीचा आकडाही पार करू शकले नाही. विशेष म्हणजे, भारताविरुद्ध इंग्लंडची कसोटी क्रिकेटमधील ही सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. (IND vs ENG 3rd D/N Test: Joe Root याचा अडथळा दूर करत पिंक-बॉल सामन्यात अक्षर पटेलचा भीम पराक्रम, Ashwin याचा '400 कसोटी' विकेट क्लबमध्ये समावेश)

भारताला 145 धावांवर बाद केल्यानंतर इंग्लंड संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला मात्र, त्यांची सुरुवात खुपच खराब झाली. पहिल्याच चेंडूवर पटेलने झॅक क्रॉलीला शुन्यावर त्रिफळाचीत केले. त्याच्या पुढच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टो डीआरएस रिव्ह्यूमुळे बाद होता होता वाचला पण पुढच्याच चेंडूवर अक्षरने त्याला त्रिफळाचीत करत माघारी धाडलं. पुढे इंग्लिश कर्णधार जो रुटने डॉम सिब्लीसह डाव सांभाळला पण अक्षरनेच 9व्या ओव्हरमध्ये सिब्लीला 7 धावांवर बाद करत इंग्लंडला चौथा धक्का दिला. यानंतर रुटने स्टोक्सच्या साथीने संघाचा डाव सावरण्याची सुरुवात केली. दोंघांनी संयमी फलंदाजी करत इंग्लंडची धावसंख्या 50 पर्यंत पोहचवली. त्यांची भागीदारी रंगत असतानाच अश्विनने 25 धावांवर खेळणाऱ्या स्टोक्सला पायचीत करत पॅव्हिलियनमध्ये पाठवले. पुढे अक्षरने रुटला बाद करत भारताच्या मार्गातील मोठा अडथळा दूर केला. रुट 19 धावांवर रिषभ पंतकडे झेल झाला. अश्विनेन ऑली पोपला 12 धावांवर आणि आर्चरला शुन्यावर बाद केले तर अक्षरने बेन फोक्सचा अडथळा दूर करत डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला. जॅक लीचला अश्विनने बाद करत इंग्लंडला 9वा धक्का दिला तर अखेर वॉशिंग्टन सुंदरने जेम्स अँडरसनला बाद करत इंग्लंडचा डाव 81 धावांवर गुंडाळला.

यापूर्वी, इंग्लंडच्या पहिल्या डावातील 112 धावांच्या प्रत्युत्तरात यजमान टीम इंडियाचा पहिला डाव 145 धावांवर संपुष्टात आला आणि त्यांना 33 धावांची आघाडी मिळाली. रोहितने भारताकडून एकाकी लढा देत 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. दुसरीकडे, इंग्लंडसाठी कर्णधार रूटने 5 विकेट घेतल्या.