IND vs ENG 2nd Test: टीम इंडियाने ‘लॉर्ड्स’ केले काबीज आणि Virat Kohli बनला विंडीज दिग्गज Clive Lloyd यांच्यापेक्षा सर्वोत्तम टेस्ट कर्णधार

2014 नंतर भारतीय संघाने पुन्हा एकदा लॉर्ड्सचे मैदान काबीज केले आणि कर्णधार विराट कोहलीने मोठ्या कसोटी विक्रमला गवसणी घातली. त्याने वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्लाइव लॉयड यांना एलिट यादीत खाली ढकलले.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स (Lords) येथे नुकत्याच संपुष्टात आलेल्या मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीम इंडियाने (India) 151 धावांनी दणदणीत विजय मिळवला. इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यावर भारतीय संघाने पहिल्या विजयाची नोंद केली. भारतीय संघाने अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या दमदार खेळीच्या जोरावर यजमान ब्रिटिश संघाला विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात यजमान संघ दुसऱ्या डावात 51.5 ओव्हरमध्ये 120 धावाच करू शकला. 2014 नंतर भारतीय संघाने (Indian Team) पुन्हा एकदा लॉर्ड्सचे मैदान काबीज केले आणि कर्णधार विराट कोहलीने मोठ्या कसोटी विक्रमला गवसणी घातली. (IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सवर टीम इंडियाची 7 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती, थरारक लढतीत इंग्लंडवर 151 धावांनी विजयावर केला शिक्कामोर्तब)

2014 मध्ये कसोटी संघाची धुरा सांभाळणारा विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा 37 वा विजय ठरला आहे. यासह त्याने वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्लाइव लॉयड (Clive Lloyd) यांना एलिट यादीत खाली ढकलले. लॉयड यांनी आपल्या कारकिर्दीत कर्णधार म्हणून 36 सामन्यात विंडीज संघाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. विराटच्या पुढे या यादीत स्टीव्ह वॉ (41), ऑस्ट्रेलियाचे माजी दोन वर्ल्ड कप विजेता कर्णधार रिकी पाँटिंग (48) आणि दक्षिण आफ्रिकी दिग्गज ग्रीम स्मिथ (53) आहेत. दरम्यान, भारतीय कर्णधारांच्या यादीत विराटने यापूर्वीच अव्वल स्थान गाठले आहे. कोहलीच्या मागे माजी दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी आहे. धोनीने 60 कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करत 27 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे नाव येते. गांगुलीच्या नेतृत्वात भारताने 49 कसोटी सामन्यात 21 सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे, इंग्लंडविरुद्ध मालिकेत पहिल्या विजयासह भारताने 0-1 अशी आघाडी घेतली आहे. दोन्ही संघ आता 25 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या हेडिंगले क्रिकेट मैदानात आमनेसामने येतील. भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सलामी जोडी अवघ्या एका धावेवर माघारी परतली. यामुळे रूटवरील दबाव वाढला. दुसरीकडे, भारतीय गोलंदाज यजमान संघाला नियमित अंतराने झटके देत राहिले. पण बटलरने एक टोक धरून बचावात्मक खेळ खेळत सामना अनिर्णित करण्याच्या इंग्लंडच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. मात्र निर्णायक क्षणी मोहम्मद सिराजने बटलरचा अडथळा दूर करत विजय भारताच्या पदरात पडला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif