IND vs ENG 2nd Test: 'England B' ला हरवल्याबद्दल धन्यवाद! Kevin Pietersen याच्या ट्विटवर खळवल्या भारतीय फॅन्सने लगावली फटकार, पहा Tweet
त्याने इंग्लंड संघाचे वर्णन 'बी टीम' केले, ज्यामुळे भारतीय चाहते संतापले आणि त्याच्यावर जोरदार हल्ला केला आहे. पीटरसनने हिंदीमध्ये ट्विट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि लिहिले की, 'इंग्लंड बी संघाचा पराभव केल्याबद्दल अभिनंदन इंडिया..."
IND vs ENG 2nd Test: अक्षर पटेल (Axar Patel) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी घरच्या परिस्थितीत इंग्लंडला (England) आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि मंगळवारी चौथ्या दिवशी दुसर्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला (India) 317 धावांनी विक्रमी विजय मिळवून चार सामन्यांची मालिका 1 बरोबरी -1 अशी बरोबरी करून देण्यात मोलाची भूमिका बजावली. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनने (Kevin Pietersen) टीम इंडियाला (Team India) विजयाच्या शुभेच्छा दिल्याच, त्याचबरोबर त्याने खिल्लीही उडवली. त्याने इंग्लंड संघाचे वर्णन 'बी टीम' केले, ज्यामुळे भारतीय चाहते संतापले आणि त्याच्यावर जोरदार हल्ला केला आहे. पीटरसनने हिंदीमध्ये ट्विट करुन टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि लिहिले की, 'इंग्लंड बी संघाचा पराभव केल्याबद्दल अभिनंदन इंडिया..." इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण खेळाडूंना विश्रांती दिली, म्हणूनच भारताने विजय मिळविला असे पीटरसनने या ट्विटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (IND vs ENG 2nd Test: 'हे' 5 खेळाडू ठरले भारताच्या विजयाचे शिल्पकार, इंग्लंडविरुद्ध केली कौतुकास्पद कामगिरी)
दुसऱ्या चेन्नई टेस्ट सामन्यादरम्यान पीटरसन इंग्लंडच्या नाणेफेक न जिंकण्याला त्यांचं खराब अवस्थेचे कारण सांगत होता, परंतु या सामन्यात टीम इंडियाने शानदार खेळ दाखवला आणि इंग्लिश संघाने मध्यमवर्गीय कामगिरी केली. दरम्यान, पीटरसनच्या ट्विटवर संतप्त नेटकऱ्यांनी माजी इंग्लंड फलंदाजाला फटकार लगावली आणि ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी झाले असतानाही टीम इंडियाने विजय मिळविला होता याची आठवण करून दिली.
एका यूजरने लिहिले की, "तुम्ही ही टीम निवडली आहे. तुमचे कोणतेही खेळाडू जखमी नाहीत. म्हणून असे म्हणणे चुकीचे आहे."
ज्याप्रकारचा खेळ केला त्यामुळे ते चुकीचे नाही
चांगले काम!
पडलो, तरी नाक उंच!
आता दोन पट भाडे द्यावे लागणार नाहीत
आता आला नाही लाईनीवर
'इंग्लंड Z'नाव द्या!
याला पाखंड म्हणतात
हा काय भ्रम आहे!
या विजयासह भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्याची आशा पल्लवित ठेवल्या आहेत. यासह तो चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत न्यूझीलंडच्या मागे दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी भारताला आता मालिकेत 2-1 किंवा 3-1 असा विजय मिळवणे आवश्यक असेल.