IND vs ENG 2nd Test: इंग्लिश चाहत्यांचे आक्षेपार्ह कृत्य! KL Rahul वर लॉर्ड्स स्टँडवरून फेकले बिअर कॉर्क, पाहा विराट कोहलीची प्रतिक्रिया
लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु असताना, ‘क्रिकेटच्या पंढरी’त एक लाजिरवाणी घटना घडली. स्टँडवरील इंग्लिश चाहत्यांनी टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुलवर वाईन कॉर्क फेकले, जो बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता. इंग्लिश चाहत्यांचे हे कृत्य पाहून स्लिपमध्ये फिल्डिंग करणारा टीम इंडिया कर्णधार विराट कोहली देखील संतापला.
IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सच्या (Lords) मैदानावर भारत (India) विरुद्ध इंग्लंड (England) दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु असताना, ‘क्रिकेटच्या पंढरी’त (Home of Cricket) एक लाजिरवाणी घटना घडली. कर्णधार जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेअरस्टो खेळपट्टीवर इंग्लिश संघासाठी भक्कम खेळ करत असताना, स्टँडवरील इंग्लिश चाहत्यांनी टीम इंडियाचा (Team India) सलामीवीर केएल राहुलवर (KL Rahul) वाईन कॉर्क (Wine Cork) फेकले, जो बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षण करत होता. इंग्लिश चाहत्यांचे हे कृत्य पाहून स्लिपमध्ये फिल्डिंग करणारा टीम इंडिया कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील संतापला. विराटने नंतर राहुलला ते कॉर्क पुन्हा चाहत्यांकडे स्टॅन्डमध्ये फेकण्याचा इशारा केला. वाइन कॉर्कच्या घटनेनंतर टीम इंडियाने पंचांकडे तक्रार केल्याचे देखील समोर आले आहे. (IND vs ENG 2nd Test: वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत कोहलीने फिरकीपटू रवींद्र जडेजा याच्याकडे सोपवला बॉल, ICC चे नवीन धोरण ठरले मुख्य कारण)
भारतासाठी रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या सलामी जोडीने लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी टीम इंडियाच्या मोठ्या धावसंख्येत बजावली. 'हिटमॅन'ने 83 धावा केल्या, तर केएल राहुलने आपली क्षमता सिद्ध केली आणि शतक झळकावले. तथापि, तिसऱ्या दिवसाच्या खेळा वेळी इंग्लंड चाहत्यांनी राहुलच्या मेहनतीचे कौतुक केले नसल्याचे दिसते आणि क्षेत्ररक्षण करताना त्याच्यासोबत अस्वीकार्य कृत्य केले. ही घटना 69 व्या षटकादरम्यान घडली जेव्हा मोहम्मद शमी इंग्लंडचा फलंदाज जो रूटला गोलंदाजी करत होता. या घटनेमुळे खेळी काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला. दरम्यान संपूर्ण घटनेदरम्यान राहुलने शांतता बाळगली असताना, कोहलीने त्याला असे करण्यास सांगितले जे पाहून नेटकर्यांनाही हसू अनावर झाले.
इंग्लंड चाहत्यांचे गैरवर्तन
विराट कोहलीची रिअक्शन
दुसरीकडे, लॉर्ड्स येथे तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या सत्रात इंग्लंडने एकही विकेट गमावली नाही. जो रूट आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली आहेत. अशाप्रकारे लंचपर्यंत ब्रिटिश संघाने 216 धावा केल्या आहेत. तसेच यापूर्वी टीम इंडियाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 364 धावांवर संपुष्टात आला. त्याच दिवशी इंग्लंडने रोरी बर्न्स, डॉमिनिक सिबली आणि हसीब हमीद अशा तीन विकेट्स गमावल्या.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)