IND vs ENG 2nd Test Day 4 Live Streaming: भारत आणि इंग्लंड संघातील दुसरी टेस्ट कुठे, कधी आणि कसे पाहणार? जाणून घ्या LIVE Streaming व TV Telecast बाबत सर्वकाही
दोन्ही संघातील चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर सामन्याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल.
IND vs ENG 2nd Test Day 4 Live Streaming: चेन्नई (Chennai) येथे दुसरा कसोटी सामना जिंकण्यापासून यजमान टीम इंडिया (Team India) अवघे काही पावलं दूर आहे तर दौऱ्यावरील इंग्लंडला आणखी 429 धावांची गरज आहे. इंग्लंडसमोर (England) भारताने तिसऱ्या दिवशी विजयासाठी 482 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, इंग्लंडने दुसर्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 53 धावांवर 3 विकेट गमावल्या आहेत. त्यामुळे, भारतीय संघ (Indian Team) आता चौथ्या दिवशी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवतील आणि इंग्लंडला दुसऱ्या डावात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करतील. तिसर्या दिवशी अश्विनने (Ashwin) इंग्लंडच्या दुसर्या डावात एक विकेट घेतला तर अक्षर पटेलने 2 बळी घेतले. कर्णधार जो रूट आणि लॉरेन्स नाबाद असून चौथ्या दिवशी हे दोघेही आपल्या टीमसाठी झगडताना दिसतील. दोन्ही संघातील चौथ्या दिवसाचा खेळ भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरु होईल. भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचं लाइव्ह प्रेक्षपण पाहू शकतात तर सामन्याचं ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टार नेटवर्कवर उपलब्ध असेल. (IND vs ENG 2nd Test Day 3: Chepauk वर Ashwin वादळ, चौकारासह पूर्ण केले शानदार 5वे कसोटी शतकासह केले अनेक कीर्तिमान)
इंग्लंडची मदार त्यांचा कर्णधार जो रूट याच्यावर असेल. पहिल्या सामन्यात रूटने द्विशतकी खेळी केली, मात्र दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फिरकीपटूंपुढे अपयशी ठरला. अशास्थितीत, यंदा इंग्लंड इंग्लंड कॅप्टन संघाला विजयीरेष ओलांडून देण्यात यशस्वी होतो की उत्सुकतेचे ठरणार असेल.
असा आहे भारत आणि इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, केएल राहुल, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.
इंग्लंड: रोरी बर्न्स, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स, जो रूट (कॅप्टन), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, क्रिस वोक्स आणि ओली स्टोन.