IND vs ENG 2nd Test Day 1: 'हिटमॅन' रोहित शर्माचे शानदार अर्धशतक, शुभमन, पुजारा कोहली आऊट; लंचपर्यंत टीम इंडियाच्या 3 बाद 106 धावा

भारत आणि इंग्लंड यांच्यात टेस्ट सीरिजमधील दुसरा सामन्याच्या लंचची घोषणा झाली असून यजमान टीम इंडियाने पहिल्या सत्रात 3 विकेट गमावून 106 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 80 धावा आणि अजिंक्यर रहाणे 5 धावा करून खेळत आहेत. मागील काही सामान्यांपासून फॉर्मशी झगडत असलेल्या रोहितने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले.

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात टेस्ट सीरिजमधील दुसरा सामन्याच्या लंचची घोषणा झाली असून यजमान टीम इंडियाने (Team India) पहिल्या सत्रात 3 विकेट गमावून 106 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma) 80 धावा आणि अजिंक्यर रहाणे (Ajinkya Rahane) 5 धावा करून खेळत आहेत. मागील काही सामान्यांपासून फॉर्मशी झगडत असलेल्या रोहितने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. दुपारच्या जेवणापर्यंत संघाने शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीच्या रूपात तीन महत्वपूर्ण विकेट गमावल्या. गिल आणि विराट भोपळाही फोडू शकले नाही तर पुजाराने 21 धावा केल्या. इंग्लंडकडून ओली स्टोन (Olly Stone), मोईन अली (Moeen Ali) आणि जॅक लीच (Jack Leech) यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. 4 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवला आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे, मालिकेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय गरजेचं आहे. (IND vs ENG 2nd Test 2021: रोहित शर्माच्या परफेक्ट कव्हर ड्राइव्हने विराट कोहली इम्प्रेस, पहा व्हिडिओ)

डावाची सुरुवात करताना भारताला शून्याच्या धावसंख्येवर पहिला धक्का लागला. ओली स्टोनच्या चेंडूवर गिल LBW होऊन पॅव्हिलियनमध्ये परतला. पहिली विकेट पडल्यानंतर रोहितने चेतेश्वर पुजारासमवेत डावाची सूत्रे हाती घेतली. रोहितने 47 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने आपले 12वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. रोहित आणि पुजारामध्ये दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी झाली. टीम इंडियाला दुसरा धक्का पुजाराच्या रूपात बसला जो 21 धावांवर आऊट झाला. लीचने पुजाराला बेन स्टोक्सच्या हाती कॅच आऊट करत माघारी धाडलं आणि यजमान संघाला दुसरा झटका दिला.  यानंतर,मैदानावर आलेला कर्णधार विराट कोहलीही काही खास करू शकला नाही आणि पाच चेंडू खेळत शून्यावर माघारी परतला. फिरकीपटू मोईन अलीने विराटला बोल्ड टीम इंडियाच्या अडचणीत वाढ केली. अशाप्रकारे संघाने 100 धावांच्या आत तीन विकेट गमावल्या.

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलने कसोटी पदार्पण केलं आहे. पटेलला शाहबाझ नदीमच्या जागी संधी देण्यात आली असून तेव टीम इंडियाकडून पदार्पण करणारा 302वा खेळाडू ठरला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now