IND vs ENG 2nd Test Day 1: रोहित शर्माचा शतकी धमाका, इंग्लंड गोलंदाजांची धुलाई करत ढोकळे 7वे टेस्ट शतक; मोडले 'हे' रेकॉर्डस्

रोहितने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 2 षटकार लगावले.

रोहित शर्मा (Photo Credits: BCCI-Twitter)

IND vs ENG 2nd Test Day 1: इंग्लंडविरुद्ध (England) दुसऱ्या चेन्नई टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाने (Team India) 3 विकेट गमावले असताना सलामी फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार फलंदाजी करत पहिल्या सत्राच्या दुसऱ्या डावात 130 चेंडू खेळत शतकी धावसंख्या गाठली. रोहितने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहितचे कसोटी करिअरमधील हे 7वे शतक ठरले तर 40वे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. इतकंच नाही तर रोहितने चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. शिवाय, रोहितने केलेल्या सातही कसोटी शतक त्याने भारतात केले असून त्याला आजवर एकदाही परदेशात शंभरी धावसंख्या पार करता आली आहे. यापूर्वी, रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकमेव अर्धशतक करत सिडनी टेस्ट सामन्यात 52 धावांचा डाव खेळला होता. तर इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात स्वस्तात बाद होणाऱ्या रोहितचा मालिकेतील पहिला मोठा डाव आहे. चेन्नई येथील पहिल्या सामन्यात 'हिटमॅन'ने अनुक्रमे 6 आणि 12 धावा केल्या होत्या. (IND vs ENG 2nd Test 2021: रोहित शर्माच्या परफेक्ट कव्हर ड्राइव्हने विराट कोहली इम्प्रेस, पहा व्हिडिओ)

इंग्लंडविरुद्ध पहिल्या शतकी खेळीसह रोहितने अनेक रेकॉर्डस् मोडले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चार शतकासह रोहितने आता या स्पर्धेत भारतीयकडून सर्वाधिक शतके ठोकली आहेत. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने तीन शतक केले आहेत. याव्यतिरिक्त, रोहितने WTC च्या सुरूवातीपासून कसोटी सलामी फलंदाजाद्वारे सर्वाधिक शतके ठोकली आहेत. त्याने चेपॉक कसोटीतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी स्पर्धेत 800 धावांचा टप्पा देखील ओलांडला. यापूर्वी, रोहितने आपले अर्धशतक पूर्ण करण्यापूर्वी जॅक लीचच्या चेंडूवर षटकार खेचला, त्याबरोबरच रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर 200 षटकार ठोकणारा पहिला भारतीय फलंदाजही ठरला असून त्याने हा टप्पा सर्वात वेगवान 123 डावात पार केला आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने 161 डाव खेळले होते.

सामन्याबद्दल बोलायचे तर चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि यजमान टीम इंडियाने दिवसाच्या पहिल्या सत्रात 3 विकेट गमावून 106 धावा केल्या. पहिल्या सत्रात भारताने 3 विकेट्स् स्वसतात गमावल्या. सलामीवीर शुबमन गिल आणि कॅप्टन विराट कोहली शून्यावर आऊट झाले. तर चेतेश्वर पुजारा 21 धावा करुन तंबूत परतला. गिल बॅड झाल्यावर रोहितने पुजारासह अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये 83 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर, उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रोहितला चांगली साथ दिली आणि इंग्लंड गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतकी भागीदारी केली.