IND vs ENG 2nd Test Day 2: रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक बॉलिंग, चेपॉकच्या मैदानावर दुसऱ्या दिवशी बनले हे प्रमुख रेकॉर्ड

ए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाने अष्टपैलू कामगिरी करत इंग्लंड संघावर 249 धावांची आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा 25 आणि चेतेश्वर पुजारा 7 धाव करून दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाबाद परतले. दरम्यान, संपूर्ण दिवसात काही महत्वपूर्ण रेकॉर्ड बनलेले जे खालीलप्रमाणे आहेत.

आर अश्विन, भारत-इंग्लंड (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs ENG 2nd Test Day 2: चेन्नईच्या (Chennai) एम. ए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाने (Team India) अष्टपैलू कामगिरी करत इंग्लंड (England) संघावर 249 धावांची आघाडी घेतली आहे. सामन्याच्या पहिल्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणेच्या तुफान फलंदाजीच्या बळावर तीनशे पार मजल मारणाऱ्या यजमान भारतीय संघासाठी रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) नेतृत्वात गोलंदाजांनी पाहुण्या संघाच्या फलंदाजांवर दबदबा कायम ठेवत पहिल्या डावात त्यांना 134 धावांवर गुंडाळलं. अश्विनने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या आणि चेंडूने मोलाचे योगदान दिले. त्यानंतर, दिवसाखेर टीम इंडियाने 1 विकेट गमावून 54 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 25 आणि चेतेश्वर पुजारा 7 धाव करून दिवसाचा खेळ संपला तेव्हा नाबाद परतले. दरम्यान, संपूर्ण दिवसात काही महत्वपूर्ण रेकॉर्ड बनलेले जे खालीलप्रमाणे आहेत. (IND vs ENG 2nd Test Day 2: टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात 1 बाद 54 धावा, दिवसाखेर इंग्लंडविरुद्ध घेतली 249 धावांची आघाडी)

1. रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 200 डाव्या फलंदाजांना बाद करणारा विश्व क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला. फिरकीचा दिग्गज मुथय्या मुरलीधरनने अश्विननंतर 191 वेळा डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद केले आहेत.

2. इंग्लंडच्या बेन स्टोक्सला बाद करत अश्विनने हरभजन सिंहचा घरच्या मैदानावरील मोठा रेकॉर्ड मोडला. अश्विन भारत सर्वाधिक टेस्ट विकेट घेणारा दुसरा गोलंदाज आहे. अश्विनने आता भारतात कसोटी क्रिकेटमध्ये 266 विकेट्स घेतल्या आहेत.

3. इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात रिषभ पंतने 77 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 58 धावा केल्या. पंत उत्कृष्ट लयीत होता आणि त्याने सर्वात कमी वयात सर्वाधिक षटकार लागवण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. पंत 23 वर्षाचा आहे.

4. भारताविरुद्ध इंग्लंड गोलंदाजांनी एकही अतिरिक्त धाव न देण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आणि पाकिस्तानला मागे टाकले. भारतीय फलंदाजांनी सर्व 329 धावा केल्या जो की एका संघाने अतिरिक्त धावा न मिळता केलेली सर्वाधिक धावसंख्या आहे.

5. इंग्लंडविरुद्ध भारताच्या पहिल्या डावात एक अजब योगायोग जुळून आला आहे. भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 95.5 ओव्हरमध्ये संपुष्टात आला आणि योगायोग म्हणजे, पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावातही भारतीय फलंदाज 95.5 ओव्हरमध्ये बाद झाले होते.

6. अश्विनने बेन स्टोक्सला कसोटी क्रिकेटमध्ये बाद करण्याची ही 9वी वेळ आहे.

7. रविचंद्रन अश्विनने कसोटी सामन्यांमध्ये 29 आणि चेपॅक स्टेडियमवर चौथ्यांदा पाच विकेट घेतल्या आहेत.

8. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड कसोटी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची ही 36वी वेळ आहे जे कोणत्याही खेळाडूद्वारे दुसऱ्या सर्वाधिक आहेत.

उल्लेखनीय म्हणजे भारताने पहिली कसोटी 227 धावांनी गमावली होती आणि चार सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहेत. उदघाटन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल फेरीत स्थान मिळविण्यासाठी मालिकेतील आणखी कोणतेही खेळ गमावणे त्यांना परवडणार नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडला टक्कर देण्यासाठी इंग्लंडला उर्वरित तीन कसोटीपैकी किमान दोन कसोटी सामने जिंकण्याची गरज आहे.