IND vs ENG 2nd Test 2021: सचिन तेंडुलकरच्या पावलावर Virat Kohli चे पाऊल, 150व्या टेस्ट डावात पाहायला मिळाला अनोखा योगायोग

यासह कोहलीने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या 150व्या कसोटी डावातील नकोशा विक्रमाची बरोबरी केली. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, सचिन देखील आपल्या 150व्या कसोटी डावात शून्यावर बाद झाला होता.

सचिन तेंडुलकर, विराट कोहली (Photo Credit: Getty)

IND vs ENG 2nd Test 2021: चेन्नईत (Chennai) इंग्लंडविरुद्ध (England) सुरु असलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) पहिल्या सत्रात तीन गडी गमावून 106 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात चाहत्यांना भारतीय (India) कर्णधार विराट कोहलीकडून (Virat Kohli) मोठ्या आशा होत्या पण 'रनमशीन' खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. विराटने पहिल्या डावात फक्त पाच चेंडू खेळले आणि ऑफस्पिनर मोईन अलीने त्याचा त्रिफळा उडवत माघारी धाडलं. यासह कोहलीने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) 150व्या कसोटी डावातील नकोशा विक्रमाची बरोबरी केली. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, सचिन देखील आपल्या 150व्या कसोटी डावात शून्यावर बाद झाला होता आणि त्यानंतर विराट कोहलीही खाते न उघडता बाद झाला. कोहली नाद झाल्यानंतर टीम इंडिया कर्णधार सचिनच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे म्हणत आहे. शिवाय, विराट अजूनही आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा अजूनही वाढली आहे. (IND vs ENG 2nd Test 2021: मोईन अलीच्या फिरकीत अडकला Virat Kohli, इंग्लंड खेळाडूंना सेलिब्रेट करताना पाहातच राहिला टीम इंडिया कर्णधार, पहा Video)

टीम इंडियाकडून आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये सचिनने सर्वाधिक 329 डाव खेळले आहेत. तीनशेहून अधिक कसोटी डाव खेळणारा मास्टर-ब्लास्टर एकमेव भारतीय आहेत. सचिननंतर राहुल द्रविडने एकूण 284 कसोटी डाव खेळले आहेत. 150 पेक्षा अधिक कसोटी डाव खेळणारा कोहली 11वा भारतीय आहे. दुसऱ्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दुपारच्या जेवणापर्यंत रोहित शर्माने नाबाद 80 धावांची अर्धशतकी खेळी केली आणि संघाला 100 धावसंख्येपार नेले. अशास्थतीत, भारतीय संघाला मोठी धावसंख्या गाठायची असल्यास रोहितची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. पहिल्या सत्रात भारताने 3 विकेट्स् स्वसतात गमावल्या. सलामीवीर शुबमन गिल आणि कॅप्टन विराट कोहली शून्यावर आऊट झाले. तर चेतेश्वर पुजारा 21 धावा करुन तंबूत परतला.

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये एकूण 3 बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराहला विश्रांती देत त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. शहबाज नदीमच्या जागी अक्षर पटेलला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली असून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरऐवजी चायमनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला स्थान देण्यात आलं आहे.