IND vs ENG 2nd Test 2021: रिषभ पंतचे दमदार अर्धशतक, टीम इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला; मोईन अलीने घेतल्या सर्वाधिक विकेट्स

पंतने दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला आणि 7वे कसोटी अर्धशतक झळकावले. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जॅक लीचला 2 तर ओली स्टोनला 3 आणि जो रूटला 1 प्रत्येकी विकेट मिळाली.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs ENG 2nd Test 2021: चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर इंग्लंडने यजमान टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव 329 धावांवर गुंडाळला. रिषभ पंतने (Rishabh Pant) दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला आपला आक्रमक खेळ सुरूच ठेवला आणि 7वे कसोटी अर्धशतक झळकावले. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अलीने (Moeen Ali) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. जॅक लीचला 2 तर ओली स्टोनला 3 आणि जो रूटला 1 प्रत्येकी विकेट मिळाली. रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्या डावात यजमान भारतीय संघासाठी सर्वाधिक 161 धावा केल्या. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने 67 तर पंतने नाबाद 58 आणि चेतेश्वर पुजाराने 21 धावांचे योगदान दिले. रविचंद्रन अश्विनने 13 धावा केल्या. संघासाठी पहिल्या दिवशी शुभमन गिल आणि कर्णधार विराट कोहली तर दुसऱ्या दिवशी इशांत शर्मा शून्यावर माघारी परतला. या सामन्यात पहिल्या दिवशी टॉस जिंकून भारतीय कर्णधार कोहलीने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, सुरुवातीला संघाने नियमित अंतराने 3 विकेट गमावल्या. (IND vs ENG 2nd Test 2021: मुंबई इंडियन्सने उघड केले Rohit Sharma याच्या शतकी खेळीचे Valentine’s Day कनेक्शन, पत्नि रिताकाला दिले खास गिफ्ट)

दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 6 बाद 300 धावांपासून दिवसाच्या खेळाला सुरुवात केली, पण मोठया धावसंख्येपर्यंत मजल मारू शकली नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच मोईनने टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले आहेत. पदार्पणवीर अक्षर पटेलला बाद केल्यानंतर मोईनने इशांतला शून्यावर माघारी धाडलं. पहिल्या दिवशी कोहलीसह गिल आणि पुजारा स्वस्तात बाद झाल्यावर रोहित आणि रहाणे यांच्यात चांगली भागीदारी झाली. रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकीर्दीचे 7वे शतक ठोकले तर, रहाणेने 23वे कसोटी अर्धशतक करून पॅव्हिलियनमध्ये परतला. दोघांमधील चौथ्या विकेटसाठी 161 धावंच्या भागीदारीने संघाचा डाव सावरला आणि मोठ्या धावसंख्येचा पाय रचला.

चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पाहुण्या संघाने जिंकत सिरीजमध्ये 0-1  आघाडी घेतली आहे. त्यामुळे, आता मालिकेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचं आहे.



संबंधित बातम्या

WTC 2025 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया कुठे आहे, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रवेश, पहा ताजे अपडेट

Australia vs India, 4th Test Day 5 Preview: पाचव्या दिवशी भारतीय फलंदाज इतिहास रचतील की ऑस्ट्रेलियन गोलंदाज कहर करतील, पाचव्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती घ्या जाणून

New Zealand vs Sri Lanka, T20I Stats: T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी, पहा दोन्ही संघांची महत्त्वाची आकडेवारी

ICC WTC 2025 Final: दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, टीम इंडिया अशी मिळवू शकते पात्रता