IND vs ENG 2nd Test 2021: Ravichandran Ashwin याला क्रिकेटच्या मैदानावर आवरला नाही डान्स करण्याचा मोह (Watch Video)
यादरम्यान, सामन्याच्या चौथ्या दिवशीचा अश्विनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानावर अश्विन चौथ्या दिवशी मजेदार मूडमध्ये दिसला आणि सामना सुरु असतानाच मैदानावर थिरकू लागला.
IND vs ENG 2nd Test 2021: रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा दणदणीत पराभव करत जबरदस्त विजय मिळवला. इंग्लंडच्या (England) पहिल्या डावात अश्विनने पाच विकेट घेतल्या तर भारताकडून दुसऱ्या डावात जबरदस्त फलंदाजी करत पाचवे टेस्ट शतक ठोकले. अश्विनच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडपुढे विजयासाठी चारशे पार धावांचे आव्हान दिले. यानंतर, पुन्हा एकदा अश्विनने कमाल खेळी करत विरोधी संघाच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला आणि भारतीय संघाच्या विजयाची वाट मोकळी केली. यादरम्यान, संघाने चौथ्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव संपुष्टात आणत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. दुसरीकडे, सामन्याच्या चौथ्या दिवशीचा अश्विनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. (IND vs ENG 2nd Test 2021: Chepauk वर विजयानंतर रोहित-विराटचा हा व्हिडिओ वर्षानुवर्षे राहील चाहत्यांच्या स्मरणात, टीम इंडियाने अशाप्रकारे केले सेलिब्रेट (Watch Video))
चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानावर अश्विन चौथ्या दिवशी मजेदार मूडमध्ये दिसला आणि सामना सुरु असतानाच मैदानावर थिरकू लागला. अश्विनने एका साऊथच्या गाण्यावर ताल धरला आणि त्याला पाहून स्टॅन्डमध्ये उपस्तित चाहते देखील खुश झाले. अश्विनने संघासाठी पहिल्या डावात बॅटने 13 धावा केल्या आणि गोलंदाजीदरम्यान पाच विकेट घेतल्या. त्यानंतर, दुसर्या डावात त्याने संयमी फलंदाजी केली आणि 148 चेंडूत 14 चौकार व एका षटकारासह 106 धावांची शतकी कामगिरी केली. त्यानंतर, इंग्लंडच्या दुसऱ्या डावात त्याने तीन महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. अश्विनला दुसर्या कसोटीतील अष्टपैलू कामगिरीबद्दल 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर टीम इंडियाने इंग्लंडला 317 धावांनी पराभूत केले आणि चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारताने दिलेल्या 482 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण पाहुणा संघ दुसऱ्या डावात 164 धावांवर ऑलआऊट झाला. भारत आणि इंग्लंड यांच्यात चालू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी आणि 4 ते 8 मार्च दरम्यान अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तिसरा कसोटी सामना पिंक-बॉल टेस्ट सामना असेल.