IND vs ENG 2nd Test 2021: अक्षर पटेलचा पॉवर 'पंच'; टीम इंडियाचा 317 धावांनी दणदणीत विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली

चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 482 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात जो रूटचा इंग्लंड संघ अवघ्या 164 धावांच करू शकला आणि मोठा पराभव पत्करावा लागला.

टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2nd Test 2021: इंग्लंडविरुद्ध (England) चेपॉक (Chepauk) स्टेडियमवर टीम इंडियाने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) धमाकेदार खेळीच्या जोरावर 317 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) दिलेल्या 482 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात जो रूटचा इंग्लंड संघ अवघ्या 164 धावांच करू शकला आणि मोठा पराभव पत्करावा लागला. या विजयासह यजमान संघाने चार सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त कमबॅक करत 1-1 ने बरोबरी साधली आहे. भारताने दिलेल्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सलग दुसऱ्या डावात इंग्लिश फलंदाज फेल झाले. कर्णधार रूटने  33 धावा केल्या तर डॅन लॉरेन्सने 26 आणि रोरी बर्न्सने 25 धावांचे योगदान दिले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सर्व फलंदाज अश्विन, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. अक्षरने 5, अश्विन 3 तर कुलदीपला 2 विकेट मिळाल्या. (IND vs ENG 2nd Test 2021: रेकॉर्डब्रेक विराट; टीम इंडियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय, कोहलीची 'कॅप्टन कूल' एमएस धोनीच्या या मोठ्या रेकॉर्डशी बरोबरी)

सामन्यात टॉस जिंकून 'विराटसेने'ने पहिले फलंदाजी करत रोहित शर्माच्या 161 धावा, उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या 67 धावा आणि रिषभ पंतच्या नाबाद 58 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 329 धावांपर्यंत मजल मारली. मोईन अलीने 4 तर ओली स्टोनने 3 विकेट घेतल्या. जॅक लीचला 2 आणि रूटला 1 विकेट मिळाली. त्यानंतर, इंग्लंड  फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आणि अश्विनच्या फिरकीत अडकले. अश्विनने इंग्लंडच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या. इशांत शर्मा आणि अक्षर पटेलने 2 व मोहम्मद सिराजने 1 विकेट घेत सिनिअर फिरकीपटूला चांगली साथ दिली. बेन फोक्स 42 धावा करून नाबाद परतला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांची खराब सुरुवात झाली. रोहित, शुभमन, पुजारा, रहाणे आणि पंत अधिक धावा करण्यात अपयशी ठरले. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि अश्विनने 96 धावांच्या भागीदारीने संघाचा डाव सावरला आणि मोठी आघाडीचा पाया रचला. अश्विनने 106 आणि विराटने 62 धावा केल्या. जॅक लीच आणि मोईन अलीने प्रत्येकी 4 व ओली स्टोनला 1 विकेट मिळाली.

टीम इंडियाने दुसऱ्या डावात 286 धावा केल्या आणि 195 धावांच्या आघाडीच्या जोरावर इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले. मात्र, पाहुण्या संघाला ते आव्हान पेलता आले नाही आणि भारताच्या फिरकीच्या त्रिकूटापुढे जोडीपुढे ढेर झाले.



संबंधित बातम्या

IND vs AUS, 4th Test Pitch Report And Weather Update: चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे फलंदाज की ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज वर्चस्व गाजवतील? सामन्यापूर्वी, मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून

South Africa vs Pakistan, 1st Test Match Live Streaming In India: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पहिली कसोटी, जाणून घ्या भारतात कधी, कुठे आणि कसे लाइव्ह मॅचचा आनंद घेता येणार

Australia vs India, Boxing Day Test: टीम इंडिया मेलबर्नमध्ये विजयाची हॅट्ट्रिक करू शकेल का? बॉक्सिंग डे कसोटीत सर्वांच्या नजरा असणार या दिग्गज खेळाडूंवर

Indian Cricketers Celebrates Christmas: MS धोनी बनला सांता आणि सचिनने चर्चमध्ये पेटवली मेणबत्ती, भारतीय दिग्गजांनी असा साजरा केला ख्रिसमस