IND vs ENG: घरच्या मातीवर कसोटी विजयासाठी इंग्लंडची तळमळ, न्यूझीलंडनंतर आता टीम इंडिया वाजवतेय रूट अँड कंपनीचा बँड
पण, अलीकडच्या काळात जो रूटच्या नेतृत्वातील संघ स्वतःच्या भूमीवर विजयासाठी तळमळ आहे. न्यूझीलंडच्या हातून पराभवाचा सामना केल्यानंतर आता विराट कोहलीची फौजही ब्रिटिश संघावर भारी पडत आहे. इंग्लंडला घरच्या परिस्थितीमध्ये शेवटचे सहा कसोटी सामने जिंकता आलेले नाहीत.
IND vs ENG Series 2021: कसोटी क्रिकेटमध्ये जो रूटच्या (Joe Root) इंग्लंड संघाची (England Team) गणना जगातील सर्वात धोकादायक संघांमध्ये केली जाते. इंग्लिश परिस्थितीत संघ कितीही मजबूत असला तरी इंग्लंडसमोर सर्वांना गुडघे टेकणे भाग पाडते. इंग्लंडचा वेगवान हल्ला घरच्या मातीवर सर्वात मोठ्या फलंदाजांवर दबाव आणते. पण, अलीकडच्या काळात जो रूटच्या नेतृत्वातील संघ स्वतःच्या भूमीवर विजयासाठी तळमळ आहे. न्यूझीलंडच्या (New Zealand) हातून पराभवाचा सामना केल्यानंतर आता विराट कोहलीची फौजही ब्रिटिश संघावर भारी पडत आहे. इंग्लंडला (England) घरच्या परिस्थितीमध्ये शेवटचे सहा कसोटी सामने जिंकता आलेले नाहीत आणि या काळात संघाला दोनदा पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. (IND vs ENG 2nd Test: लॉर्ड्सवर महामुकाबल्यात टीम इंडियाच्या विजयाची 3 मोठी कारणे जाणून घ्या)
भारताविरुद्व लॉर्ड्स कसोटी (Lords Test) देखील इंग्लिश संघ चौथ्या दिवशी विजयाच्या वाटेवर होता पण पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या (Team India) तळाच्या खेळाडूंनी इंग्लंडचा खेळ खल्लास केला आणि आणि संघासाठी विजय खेचून आणला. इंग्लिश टीमने 2020 मध्ये पाकिस्तानविरुद्ध शेवटचा कसोटी सामना जिंकला होता. हा मालिकेतील पहिला सामना होता आणि त्यानंतरचे दोन्ही कसोटी सामने पाकिस्तान संघ अनिर्णित करण्यात यशस्वी झाला. पाकिस्ताननंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी किवीने इंग्लिश संघाचा पराभव करत कसोटी मालिका 1-0 अशी जिंकली, तर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. किवी संघाकडून मालिका गमावल्यानंतर भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतही इंग्लंडची स्थिती खराब आहे.
ट्रेंट ब्रिजवर पाऊस ब्रिटिशांसाठी धावून आला, पण संघाला लॉर्ड्सवर लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. म्हणजेच इंग्लिश परिस्थितीमध्ये यजमान संघाने शेवटच्या 6 कसोटी सामन्यांमध्ये विजयाचा चेहरा पाहिला नाही. यामुळे आगामी सामन्यांमध्ये संघाच्या कामगिरीवर निश्चित परिणाम होऊ शकतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्लेच्या लीड्स येथे खेळला जाणार आहे. भारताने 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. आणि आता 14 वर्षांनंतर मालिकेत 1-0 अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाकडे इंग्लिश संघाला त्यांच्या घरी मात देण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.